फिरायला जायचा प्लान करताय तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कमी खर्चात, कमी वेळात आपण महाराष्ट्रातच सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा व सहलीचा आनंद लुटू शकतो.चला तर मग पाहुया महाराष्ट्रातील फिरण्यासाठी चांगली 10 ठीकाने
Showing posts with label पर्यटन. Show all posts
Showing posts with label पर्यटन. Show all posts
महाराष्ट्रामध्ये फीरण्यासाठी चांगली 10 ठिकाण कोणती आहेत?
1}मुंबई -:
मुंबईमुंबई शहर हे स्वन्नांचे तसेच कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असून ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे विविध खाण्याची दुकाने, अदभूत वास्तुकला आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. सुट्टी घालविण्यासाठी विविध मनोरज ठिकाणांनी भरलेले ठिकाणे आहेत. तसेच प्रसिध्द मंदिर, चर्च, मस्जिद अशा धार्मीक स्थळांना देखील भेट देण्यासारखे सुंदर ठिकाणे आहेत.
1-मुंबई मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन ठिकाण: गेटवे ऑफ इंडिया
2-मुंबई चे समुद्रकिनारे: चौपाटी आणि जुहू बीच
3- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
4-वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय
5-सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर
6-हाजी अली
7-नेहरू तारांगण
2}रायगड-:
रायगडावर फिरण्यासाठी अनेक प्रवेशद्वार, मंदिरे, पाण्याची टाकी, राजवाडे आणि हिरकणी बुरुज
प्रवेशद्वार,महा दरवाजा, पालखी दरवाजा, नगारखाना दरवाजा आणि मेणा दरवाजा
मंदिरे जगदीश्वर मंदिर, सतीची समाधी आणि राणी महालाचे अवशेष,पाण्याच्या टाक्या,गंगा सागर, टकमक, हत्ती तलाव आणि खुबलाधा बुरुज , छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध पुतळा, टकमक टोक डोंगर आणि राणी वसा
3}महाबळेश्वर-:
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.
महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्थर्स सीट ह्या पॉईंट वरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय.
4}छत्रपती शाहू संग्रहालय-:
कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालय 1877 - 1884 या कालावधीत बांधण्यात आले होते. त्याची रचना ब्रिटिश वास्तुविशारद 'चार्ल्स मांट' यांनी केली होती आणि गुजरात आणि राजस्थानमधील जैन आणि हिंदू प्रभावांचे मिश्रण असलेल्या स्थापत्य शैलीनुसार ते बांधले गेले होते. स्थानिक राजवाडा शैलीचा स्पर्श. सध्याच्या काळात, राजवाड्याचा एक मोठा भाग म्हणजे पहिला मजला आजही कोल्हापूरच्या विद्यमान महाराजांचे निवासस्थान म्हणून वापरला जात आहे आणि दुसरीकडे, तळमजला संग्रहालयात रूपांतरित झाला आहे, जो छत्रपती शाहू महल म्हणून ओळखला जातो.
5}अजंठा-वेरुळ -:
संभाजिनगर जिल्ह्यातील या काही विशेष पर्यटन स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.त्या मध्ये याचां सामावेश झाला आहे म्हणुन हि विशेष ठिकाणं बघण्यासाठी केवळ देशातील नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे गर्दि करतात .
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर आहे. आल्हाददायक हवामान आणि शांत वातावरणामुळे सुंदर जंगलात हरवून जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. छोटय़ा छोटय़ा शेतजमिनी आणि वाडय़ांमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे दृश्य हे या निर्मळ स्थानाचे सर्वात प्रशंसनीय वैशिष्ट्य आहे. पाचगणी तुमची भटकंतीची इच्छा पूर्ण करेल आणि तुम्हाला या हिल स्टेशनच्या प्रेमात पडेल.
लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक अतिशय सुंदर आणि रहस्यमय तलाव आहे. लोणार क्रेटर तलावाचा उगम सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर जेव्हा उल्का आदळला तेव्हा झाला असे मानले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचे पाणी खारा आणि क्षारीय आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अशा प्रकारचे एकमेव सरोवर आहे. या चमत्कार आणि वैशिष्ट्यांमुळे लोणार क्रेटर तलाव दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते
चिखलदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्ह
येथे मुख्य ठीकाणे-
पंचबोलचे नाव इको पॉईंट.
देवी पॉईंट
नर्सरी गार्डन
प्रॉस्पेट पॉईंट
बेलाव्हिस्टा पॉईंट
बेलेन्टाईन पॉईंट
भीमकुंड
विदर्भात नागपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळे
दीक्षाभूमी, उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्य, अंबाझरी तलाव व उद्यान, फुटाळा तलाव, पेंच व्याघ्र प्रकल्प, गोरेवाडा तलाव, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, रामटेक किल्ला, क्रेझी कॅसल एक्वा पार्क, खिंडसी तलाव, रमण सायन्स सेंटर, श्री गणेश मंदिर. , स्वामीनारायण मंदिर, फन एन फूड व्हिलेज आणि बरेच काही.
10}ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प-:
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे. त्याच्या उष्णकटिबंधीय कोरड्या पर्णपाती वन परिसंस्थेमध्ये किमान बंदर आहे 80 वाघ, आणि मोठ्या लँडस्केपमध्ये 200 पेक्षा जास्त वाघ आहेत. ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी वाघांची संख्या म्हणून ओळखली जाते. ताडोबा यासह इतर अनेक मांसाहारी प्रजातींना देखील समर्थन देतो बिबट्या आणि ढोले, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि गौर सर्वात सामान्य शिकार प्रजाती आहे.
ताडोबाच्या इतिहासाबद्दल आणि जैवविविधतेबद्दल अधिक जाणून घ्यायच असेल तर आवश्य भेट दया.
उज्जैन (महाकाल) दर्शन यात्रा।
उज्जैन फिरा आमच्या सोबत।
उजैन यात्रा सर्वोत्तम वेळ कधी-मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान.
उज्जैनच्या सहलीसाठी योग्य कालावधी म्हणजे 2 दिवसांची सहल. तुम्ही शहरातील सर्व ठिकाणे आणि जवळपासच्या पर्यटन स्थळांचाही आनंद घेऊ शकता.
हवाई मार्गे-: उज्जैनचे सर्वात जवळचे विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ आहे, जे शहरापासून 50 किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग -: जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन.
अंतर -: मुबंई - उज्जैन 640 km (12 तास)
छ.संभाजीनगर - उजैन 470 km (9तास)
नागपुर - उजैन 540 (10तास)
उज्जैन मध्ये भेट देण्याची ठिकाणे-:
1. महाकालेश्वर मंदिर
हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाय, हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याची रचना अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने केली गेली आहे.या मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा आहे. उज्जैनमधील नागरिकांना दूषण नावाचा एक राक्षस त्रास देत होता. त्याचा नायनाट करण्यासाठीच शंकर महादेवांनी महाकाल रूप धारण केलं आणि उज्जैनमध्ये प्रकटले.
2. काल भैरव मंदिर-:
कालभैरव मंदिर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर तंत्र पंथ आणि काळ्या जादूशी देखील संबंधित आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येतात.
3. कालियादेह पॅलेस-:
कालियादेह पॅलेस हा शिप्रा नदीच्या काठावर असलेला एक राजवाडा आहे. हे उज्जैनमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. एकदा सूर्यकुंड-ब्रह्माकुंड नावाच्या दोन टाक्यांसह शिप्रा नदीच्या काठावर सूर्याचे सुंदर मंदिर आहे.
4. जंतरमंतर उज्जैन-:
जंतरमंतर अथवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इ. स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या त्यतीलच हि एक आहे.
राम घाट-:
कुंभमेळ्याचा भाग असलेल्या लाखो लोकांपैकी तुम्ही एक असाल तर तुम्ही राम घाटाला भेट दिलीच पाहिजे. याच ठिकाणी पहाटेच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी अनेक आरत्या होतात. नदीच्या पाण्यात सुंदर आरती आणि ज्वालांचे प्रतिबिंब पाहण्यासारखे आहे.
इतर ठीकाणे-:
हरसिद्धी मंदिर
इस्कॉन मंदिर
भर्त्रीहरी लेणी
भारत माता मंदिर
उजैन विषयी हटके-:राजाचा मुक्काम झाला तर…
फार पूर्वापार काळापासून, एक अशी कथा सांगितली जाते की उज्जैन या शहरात कुणीही राजा वास्तव्य करत नाही. याचं कारण असं, की कुठल्याही राजाने इथे वास्तव्य केलं तर त्याच्यावर आपलं साम्राज्य गमावण्याची पाळी येते.
असं म्हटलं जातं, की देशाचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं सरकार ज्यादिवशी कोसळलं, त्याच्या आदल्या दिवशी त्यांचं वास्तव्य उज्जैनमध्ये होतं.
सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.