पोलीस पंचनामा

पोलिस पंचनामा म्हणजे काय व पंचनाम्याचे प्रकार. पोलिस पंचनामा कसा करतात. पंचनाम्यात काय असते ? पंचनामा का करतात ?

    


पोलिस तपासातील पंचनामा हा महत्त्वाचा भाग आहे. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळविण्याच्या दृष्टीने पंचनामा महत्त्वाचा मानला जातो. पंचनामा म्हणजे घडलेल्या अपराधाची सर्व माहिती सांगणारा महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. गुन्हा नेमका काय होता ,गुन्हा कोठे घडला, कसा घडला, केव्हा घडला आणि का घडला या सर्व प्रश्नांचे उत्तर पंचनाम्यामध्ये मिळून येते. पंचनाम्याचे पुढील पाच प्रकार असतात . तपासाच्या वीवीध टप्प्यावर पंचनामा करण्यात येतो चला तर मग आपण पाहुया कोणकोणत्या प्रकारचा पंचनामा असतो. पंचनाम्यात काय असते.पोलिस पंचनामा का करतात.पंचनाम्याचे प्रकार किती व कोणते.अशा अनेक प्रश्नाची उत्तरे यामध्ये पाहुया 


घटनास्थळ पंचनामा-:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 157(1) या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही दखलपात्र अपराध घडल्यानंतर पोलीस अधिकारी त्याची नोंद करून शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी घटनास्थळी . घटनास्थळी पाहिलेल्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी घटनास्थळ पंचनामा करण्यात येतो. ज्या ठिकाणी अपराध घडला आहे तेथील निश्चित स्थानाचे आकलन होण्याच्या दृष्टीने घटनास्थळ पंचनामा महत्त्वाचा आहे. या पंचनाम्यात घटनेचे निश्चित स्थान, भौगोलिक स्थान तसेच स्थावर व भौतिक वस्तू, दिशा यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळते. तसेच घटनास्थळावर अपराधाच्या तपासाच्या दृष्टीने पुरावा म्हणून उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून या वस्तू पंचाच्या सहीने ताब्यात घेता येतात. अपघात किंवा इतर प्रसंगात घटनास्थळाचा पंचनामा करतांना मोजमाप घेवून इतर अधिकाऱ्यांकडून नकाशा तयार करतात. असा नकाशा, चित्र, टीपा यांचेसह हा पंचनामा न्यायालयात पुरावा म्हणून हजर करता येतो. या पंचनाम्याचे खुप महत्व असते.


अटक पंचनामा किंवा अंगझडती पंचनामा -:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 51 व 52 या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही अपराध घडल्यानंतर त्या अपराधाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीस अटक करतात. अटक केल्यानंतर त्या व्यक्तीची अंगझडती घेतली जाते त्यालाच अटक पंचनामा असे म्हणतात. यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला तिला अटक का केली, कुठे केली, कशाबाबत केली याची माहिती देण्यात येते. तसेच त्या व्यक्तीच्या अंगावरील जखमा, व्रण, चीजवस्तू यांचा उल्लेख करण्यात येतो. त्या व्यक्तीजवळ आढळून आलेल्या वस्तू पंचाच्या सहीसह ताब्यात घेतल्या जातात. त्या वस्तू त्या व्यक्तीला नंतर परत करता येतात. परंतु पुरावा म्हणून उपयोगी पडणाऱ्या वस्तू, हत्यारे किंवा इतर संशयास्पद वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून त्या वस्तु जप्त करण्यात येतात. महीला आरोपी असतील तर महीला पंचाची आवश्यकता असते.


मालमत्ता पंचनामा -:

 हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 165(1) व कलम 100(5)या कलमान्वे करण्यात येतो. या पंचनाम्यामध्ये  वेगवगळ्या  प्रकारच्या अपराधांमध्ये मुद्देमाल किंवा चीजवस्तू जप्त केल्या जातात. अशा अपराधांमध्ये तसेच उघड्या जागेवर पडलेला माल, बेवारस वस्तू, गुन्ह्याच्या पुराव्यासंबंधीचे हत्यार, चोरीचा माल, प्रेत अशा अनेक प्रकारच्या वस्तू मालमत्ता पोलीस तपासासाठी ताब्यात घेतात. अशावेळी याठिकाणी जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात येतो. यामध्ये त्या वस्तूचे, मालमत्तेचे नाव, वर्णन करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेतल्या जातात.


इन्क्वेस्ट पंचनामा-:

एखाद्या व्यक्तीचा अकस्मात, संशयास्पद किंवा अपघातात मृत्यू झाला तर तिच्या मृतदेहाचा पंचनामा करतात. या पंचनाम्यास इन्क्वेस्ट पंचनामा असे म्हणतात. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 (1) प्रमाणे मरणोत्तर चौकशी करण्यात येते. या कलमाप्रमाणे करण्यात येणाऱ्या पंचनाम्यामध्ये मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे वर्णन, तिच्या शरीरावरील खुणा, व्रण तसेच तिच्या अंगावरील चीजवस्तू तसेच अंगावर दिसत असलेल्या जखमा, मृतदेहाच्या आसपास मिळून आलेल्या वस्तू, हत्यार याची माहिती देण्यात येते. मृतदेहाच्या जवळपास सापडलेल्या वस्तू पुरावा म्हणून उपयोगात येतात. म्हणून त्या सर्व वस्तू व हत्यार यांचा पंचनामा करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेण्यात येतात. इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यास आहे. हा पंचनामा केल्यानंतर मृतदेह वैद्यकीय शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठविण्यात येतो. अशा प्रकारे इन्क्वेस्ट पंचनामा करतात.


 मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा-:

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 27 प्रमाणे मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा करण्यात येतो. अटक केलेल्या आरोपीने त्या गुन्ह्याशी संबंधित एखादे हत्यार किंवा वस्तू किंवा मुद्देमाल काढून दिल्यानंतर त्यासंबंधी आरोपीने केलेले निवेदन पंचासमोर लिहून घेतात. त्यालाच मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा असे म्हणतात. या पंचनाम्यावर आरोपी, पंच, पोलीस अधिकारी यांची सही असते. आरोपीने निवदेन पंचनामा लिहून दिल्यानंतर तो सांगेल त्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन तेथे आढळून येणाऱ्या वस्तू, हत्यार ताब्यात घेता येतात. ताब्यात घेतल्यानंतर त्यावर पंचाच्या सह्या घेण्यात येतात. याला मेमोरंडम पंचनामा असे म्हणतात. 

आणखी वाचा >> FIR व NCR म्हणजे काय? 


अशा प्रकारची कायद्यासंबधी महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या