बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? बियाने खरेदी करताना फसवल्यास काय करावे ?बियाने उगवलेच नाही तर काय करु ?
पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. त्यामुळे मशागतीची कामे उरकून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी लगबग करत आहेत. मात्र ही बियाने खरेदी करताना शेतकरी अनेकदा फसवला जातो मात्र हि फसवणूक आपणाला सहज टाळता येवू शकते. त्यासाठी शेतकर्यांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. चला तर मग आता आपण या लेखात बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी या विषयी माहिती पाहूया.
बियाने खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या-:
👉🏻सर्वात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे.
👉🏻जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे त्यावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाणे उत्पादकाचे नाव, लॉट क्रमांक,व विक्री किंमत असल्खायाची खात्री करून घ्यावी . दिलेल्या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची सही किंवा अंगठा असला पाहिजे.
👉🏻दुकानदाराकडुन पक्क्या बिलाचा आग्रह धरावा व बिल व्यवस्थित जपून ठेवावे.
👉🏻खरेदी केलेल्या बियाण्याची पाकिटे सीलबंद आहेत किंवा नाही यांची खात्री करावी
👉🏻बियाणे खरेदी करण्याआधी पाकीटावरील अंतिम मुदत पाहणे जरुरीचे आहे.
👉🏻बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी.
👉🏻पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.
👉🏻बियाणाची पिशवी तिन्ही बाजूंनी शिवलेली असावी. वरील बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते. पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरणचा टॅग व्यवस्थित राहतील. लेबल आणि टॅग व्यवस्थित जपून ठेवावे.
👉🏻मुदतबाह्य झालेले व पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.
बियाणं विषयी काही तक्रार असेल तर काय करावे-:
बियाणं विषयी काही तक्रार असेल तर बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आसतात. तसेच प्रमाणा पेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती याच्याकडे नमुन्याची तपासणीसाठी तक्रार अर्ज स्वरूपात द्यावी. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची zerox जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.
👉🏻शेतकर्यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत कलेली असते.
वरील दिल्या गेलेल्या गोष्टींचे आपण तंतोतंत पालन केले तर होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतो. आणि भविष्यात होणार आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो .
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!