Showing posts with label शेती विषयी. Show all posts
Showing posts with label शेती विषयी. Show all posts

आर,गुंठा,एकर,हेक्टर,बिघा,म्हणजे कीती?

आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.



शेतकर्‍यांचा संबंध येणारा सर्वात महत्वपूर्ण कागद म्हणजे ७/१२ उतारा,तो उतारा वाचत असताना आपण काही शब्द बघतो ते म्हणजे आर,गुंठा, त्याच बरोबर इतरही शब्द तुमच्या कधी न‌ कधी कानावर पडले असतील जसे की एकर,हेक्टर,बिघा  हे शब्द वाचतान तुम्हालाही कधी-कधी प्रश्न पडत असेल नेमक हे शब्द आहेत काय हे कसे तयार झाले . चला तर मग या लेखा मधुन आपण समजुन घेऊया,आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.आर,गुंठा,एकर,हेक्टर,बीघा म्हणजे काय ?






खरं तर हे आर, गुंठा, एकर, हेक्टर, बिघा हे जमीन मोजण्याची एकके आहेत.

आर म्हणजे काय -:


आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. यामध्ये काय करतात तर जमीनीच मोजमाप मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.

गुंठा म्हणजे काय -:



पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत होती  त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.

गुंठा : १ गुंठा जमीन = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
 

एकर म्हणजे काय -:


एकर हे जमिन मोजण्याचे आपल्याकडील प्रसिद्ध एकक आहे.

 १ एकर = ४०४६.८७२६ चौरस मीटर.

 १ एकर = ४० गुंठे. 

 म्हणजेच  १ एकर जमीन = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर ( साधारणत: चाळीस गुंठे म्हणजे एक एकर)


अशा प्रकारे एक एकर तयार होतो.


हेक्टर म्हणजे काय-:



आपल्याकडे जमीन किंवा शेत जमीन ही हेक्टर मध्ये मोजली जाते. ४० गुंठ्यांचा मिळून १ एकर बनतो. १ गुंठा ३३ बाय ३३ फुटांचा असतो. एक हेक्टर म्हणजे किती एकर याचं उत्तर २.४७ एकर होय. याचाच अर्थ की ९८.८ गुंठा जमीन म्हणजे १ हेक्टर होय. १०००० चौरस मीटर चा एक हेक्टर होतो.

थोडक्यात हेक्टर (हे.) = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर (अडीच एकर म्हणजे एक हेक्टर) शंभर गुंठे किंवा शंभर आर म्हणजे एक हेक्टर (आर - हा शब्द 7/12 वर वापरला जातो)


बिघा म्हणजे काय -:


बघा हा शब्द भारतीय बोलीभाषेत आहे.पण प्रत्येक प्रदेशातील ठिकाणानुसार त्याचं परिमाण बदलतं

👉 बिहार मध्ये एक बीघा म्हणजे 2529.2 वर्ग मीटर

 👉राजस्थान मध्ये 2500 वर्ग मीटर

 👉बंगाल मध्ये. 1333.33 वर्ग मीटर

 👉आसाममध्ये 14,400 चौरस फूट (1337.8 चौरस मीटर).

 👉महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा (आर), एकर, हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत.

थोडक्यात काय तर -:
 
1 हेक्टर = 10000 चौ. मी. 1 एकर = 40 गुंठे.

1 गुंठा = [33 फुट x 33 फुट ] =

1089 चौ फुट.

1 हेक्टर = 2.47 एकर = 2.47 x 40 =

98.8 गुंठे.

1 आर = 1 गुंठा.

1 हेक्टर = 100 आर.

1 एकर = 40 गुंठे x [33 x 33] =

43560 चौ फुट.

1 चौ. मी . = 10.76 चौ फुट .

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.




Share:

‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय?

 ‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय व कसे बनवावे ?‌‌‌‌‌मनरेगा जाँब कार्डचे फायदे ,‌‌‌‌‌ मनरेगा जाँब कार्डसाठी कागदपत्रे व प्रोसेस काय असते . 





जाँब कार्डची गरज काय-:

जॉब कार्ड जॉब कार्ड ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जारी केले जाते. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत बनवलेले एक कार्ड आहे.ज्याद्वारे ते प्रत्येक वर्षात कोणतेही अकुशल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायद्यानुसार 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा मागण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.या जॉब कार्डने लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी दीली आहे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील या कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉब कार्डमध्ये नोंदवली जाते. यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जॉब कार्ड दिले जातात.

जाँब कार्डमध्ये काय असते-:

या कार्डमध्ये खालील माहिती असते

👉 जाँब कार्ड क्रमांक.

👉उमेदवाराचे नाव. 

👉वडील किंवा पतीचे नाव. 

👉पंचायत व जिल्ह्याचे नाव.

👉ग्रामसभेचे नाव.

👉वय.

👉लींग.


जाँब कार्ड कसे बनवावे -:

जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जावे लागेल. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा. त्याला भरून ते सांगतील ते आवश्यक कागदपत्रे जोडुन त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापरुन तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

मनरेगा जाँब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-:

 👉उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र.

👉 अर्जाचा नमुना.

 👉पासपोर्ट आकाराचे फोटो.

 👉पत्त्याचा पुरावा.

 👉रेशन कार्ड.

 👉आधार कार्ड.

👉पासबुक.

 👉मोबाईल नंबर.

जॉब कार्डवर ऑनलाइन नाव कसे पहावे-:

सर्वप्रथम जॉब कार्डच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in  वर जा. येथे दिलेल्या लिंकद्वारे थेट वेबसाइटवर जाण्यास येथे क्लिक करा.

                        👇

जॉब कार्ड वेबसाइट उघडल्यानंतर, ग्रामपंचायत अंतर्गत अहवाल तयार करा – जॉब कार्ड पर्याय निवडा.

                           👇

आता सर्व राज्यांची यादी उघडेल. त्यात तुमच्या राज्याचे नाव शोधा आणि ते निवडा.

                            👇

यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. यामध्ये प्रथम आर्थिक वर्ष निवडा. यानंतर तुमच्या जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.

                             👇

आता जॉब कार्डशी संबंधित माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. जॉब कार्डमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी R1 बॉक्समधील JobCard/Employment Register पर्याय निवडा.

यानंतर, तुम्ही निवडलेल्या ग्रामपंचायतीची जॉबकार्ड यादी उघडेल. तुम्ही जॉब कार्डमध्ये तुमचे नाव येथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही आँनलाईन नआव व इतर तपशील संकेतस्थळावर पाहु शकत.


आणखी वाचा >> 1 रुपयांत काढा पिक विमा.


मनरेगा जाँब कार्डचे फायदे-:

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, लाभार्थ्याला 100 दिवसांचा रोजगार मिळतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नरेगा जॉब कार्ड दिले जाईल.

 👉या योजनेंतर्गत लोकांना त्यांच्याच क्षेत्रात काम मिळते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही.

👉या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजगार मिळु शकेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

 👉जॉब कार्डमध्ये अर्जदार आपले नाव आणि जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतो.

 👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातही लाभ दिला जातो.

👉 जॉब कार्डद्वारे भारतातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

👉नरेगा जॉब कार्डमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 देशातील सर्व राज्यातील गरीब लोक जॉब कार्डचा लाभ घेऊ शकतात.

 👉नरेगा जॉब कार्डची सुविधा ऑनलाइन असल्याने अर्जदाराचा वेळही वाचतो.

👉जॉब कार्डमध्ये तुम्हाला मनरेगा योजनेद्वारे मिळणार्‍या कामाची सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.

👉अर्ज केल्याच्या १५ दिवसांत काम न मिळाल्यास नियमितपणे बेरोजगार भत्ता दिला जाईल.

 👉योजनेंतर्गत नोकरीसाठी केवळ प्रौढ सदस्य पात्र आहेत.

👉 प्रत्येक प्रकल्पात किमान एक तृतीयांश महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.

 👉कामाचे ठिकाण ५ कि.मीच्या असते बाहेर असल्यास, कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता दिला जातो.

 👉महिला आणि वृद्धांना त्यांच्या परिसरात काम करण्यास प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा >> जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना 


मनरेगा योजनेंतर्गत सर्व कामगारांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामगारांसाठी अधिकृत मोबाइल अप्लिकेशन सुरू केले आहे. ज्यातून तुम्ही घरबसल्या नरेगाशी संबंधित माहिती मिळवू शकता. अँप डाउनलोड करण्यासाठी 👇👇

                येथे क्लिक करा.





हे अँप डाउनलोड करून‌ तुम्ही सर्व माहिती मोबाइल मध्ये बघु शकता. 


ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

 आणखी वाचा >> भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग 1मध्ये  कशी आणायची 


आणखी वाचा >>  लंपी विषाणू मराठी माहिती.

Share:

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

 बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? बियाने खरेदी करताना फसवल्यास काय करावे ?बियाने उगवलेच नाही तर काय करु ? 



पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते.  त्यामुळे मशागतीची कामे उरकून बियाणे  व खत खरेदीसाठी शेतकरी लगबग करत आहेत.  मात्र ही बियाने खरेदी करताना शेतकरी अनेकदा फसवला जातो मात्र हि फसवणूक आपणाला सहज टाळता येवू शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. चला तर मग आता आपण या लेखात बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी या विषयी माहिती पाहूया.


बियाने खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या-:

👉🏻सर्वात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. 


👉🏻जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे त्यावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाणे उत्पादकाचे नाव, लॉट क्रमांक,व  विक्री किंमत असल्खायाची खात्री करून घ्यावी .  दिलेल्या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची सही किंवा अंगठा असला पाहिजे. 


👉🏻दुकानदाराकडुन पक्क्या बिलाचा आग्रह धरावा व बिल  व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻खरेदी केलेल्या बियाण्याची  पाकिटे सीलबंद आहेत किंवा नाही यांची खात्री करावी


👉🏻बियाणे खरेदी करण्याआधी पाकीटावरील अंतिम मुदत पाहणे जरुरीचे आहे.


👉🏻बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. 


👉🏻पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.


👉🏻बियाणाची पिशवी तिन्ही बाजूंनी शिवलेली असावी. वरील बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते.  पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरणचा टॅग व्यवस्थित राहतील. लेबल आणि टॅग व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻मुदतबाह्य झालेले व पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.


बियाणं विषयी काही तक्रार असेल तर काय करावे-:

बियाणं विषयी काही तक्रार असेल तर बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आसतात. तसेच प्रमाणा पेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती याच्याकडे नमुन्याची तपासणीसाठी  तक्रार अर्ज  स्वरूपात द्यावी. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची zerox जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.


👉🏻शेतकर्‍यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत कलेली असते.



वरील दिल्या गेलेल्या गोष्टींचे आपण तंतोतंत पालन केले तर  होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतो. आणि  भविष्यात होणार आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो .

Share:

भोगवटदार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची?करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.

 भोगवटादार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची वर्ग 1 मध्ये कशी आणायची? करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.



भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार असतो. त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा आणि ती जमिन बक्षीसपात्र म्हणुन देण्याचे पूर्ण अधिकार बहाल केलेल असतात. अशा जमीनींचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री व हस्तांतरणासाठी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते . ही मालकीची वडलोपार्जीत आलेली जमीन  असते.

भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार तर असतो. पण त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार नसतं त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतनाच्या जमीन, वनजमीन, गायरान, पुनपुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. 

👉भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनातर्फे शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी या जमिनीबाबत व्यवहाराचे अधिकार नसतात. म्हणजेच या जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी जर भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत कशी करावी?

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या भावाच्या आर्धी (50%)  रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.(अर्थीत शासनकडुन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येते.)  वर्ग 2 ची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन(प्रत्यक्ष) पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो .तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळते.

भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-


👉जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज.

👉 जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा.

👉विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.

👉7/12 व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी.

👉आकरबंदाची मूळ प्रत.

👉एकत्रीकरनाचा मूळ उतारा.

👉मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत
कबुलायत.

👉तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा.

#भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधील सवलतीला 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.


👉 तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास  इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर  महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व  आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.




Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels