कीसान क्रेडिट कार्ड(kisan credit card scheme)

काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme) किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc) किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)किसान क्रेडिट कार्ड तक्रारीसाठी हेल्पलाईन नं , किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?




भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान ,पाऊस हे प्रमुख घटक आहेत. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.


काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme)-:


👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते.

👉🏻किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड  द्वारे तयार करण्यात आली.

👉🏻कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली.

👉🏻हे त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करते.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)-:

👉🏻सर्व शेतकरी-व्यक्ती/संयुक्त कर्जदार जे मालक शेती करणारे आहेत .भाडेकरू शेतकरी, तोंडी भाडेपट्टेदार आणि शेअर क्रॉपर्स इ. एसएचजी किंवा शेतकऱ्यांचे संयुक्त उत्तरदायित्व गट ज्यात भाडेकरू शेतकरी, शेअर पीक घेणारे, इत्यादि 

👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी लागणारी पात्रता
लाभार्थी शेतकरी असावा त्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे व 70 पेक्षा जास्तहि नसावे. जर कर्जदार हा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल व घ्यायचे असेल तर  60 वर्षापेक्षा कमी वयाचा सहकर्जदार असणे आवश्यक आहे.


किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc)-:

👉🏻आधारकार्ड, पैन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट (कोणताही एक)

👉🏻सातबारा उतारा

👉🏻बँक अकाउंट माहिती

👉🏻 मोबाईल नंबर

👉🏻अर्जदाराचा पासपोर्ट फोटो

👉🏻वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु वरील काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे

👉🏻किसान क्रेडिट कार्ड घेताना शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांनी पूर्वी घेतलेल्या कृषी कर्जाची माहिती देणं आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)-:

👉🏻या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.

👉🏻 सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.

👉🏻शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते...

👉🏻केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येते जे कर्ज फेडण्यासाठी योग्य कालावधी देते.

👉🏻शेतकरी बँकेने त्यांना दिलेली पत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. बँक शाखा व किसन क्रेडिट कार्ड पासबुकवर उपलब्ध पैसे काढण्याच्या स्लिपचा वापर करुन रोख रक्कदिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी  4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज कसा करावा -:


सरकारनं पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे तो डाउनलोड करुन भरुण घ्यावा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत घेऊन जायचा आहे. त्यासोबत सातबारा उतारा आणि 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रं घेऊन जावी लागणार आहेत.एकदा तुम्ही ही कागदपत्रं बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत.

किसान क्रेडिट कार्ड योजना आँनलाईन अर्ज कसा करावा-:

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही सेवा फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.

तक्रारीसाठी हेल्पलाईन( helpline )-:

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात जर शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावर ते आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी 011-24300606 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा समस्या सांगू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरुनही आपली तक्रार नोंदवू शकता. 

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या