पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात व आपण पशु-पश्यांच्या संकेतावरुन पावसाचा अंदाज कसा बांधु शकतो.
मानवाने कीतीही प्रगती केली असली तरी देखील मानवाला निसर्गावरच अवलंबुन राहाव लागत आहे. आपण कीतीही निसर्गाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तरी नीट बांधता येत नाही. आता पावसाचच बघाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या बारीक निरीक्षणावरुन हे संकेत लक्षात येतात. आपणही जर पशु-पक्षी यांच्या हालचाली निट बघितल्या तर आपणही बरोबर अंदाज बांधु शकतो.चला तर मग बघुया की पशु-पक्षी आपल्याला कसे संकेत देतात ज्यावरुन आपणही पावसाचा अंदाज अगदी सहज लाऊ शकतो.
👉🏻चातक पक्षी-:
मृगनक्षत्र वेळेवर असल्याचे संकेत व पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात.पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ समजावी.
👉🏻तित्तर पक्षी-:
हा पक्ष्यांचे थवे 'कोडय़ान केको.. कोडय़ान केको..' अशा स्वरात ओरडू लागले की, लवकरच पाऊस येणार असे समजावे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की, पावसाचे लक्षण समजले जाते.
👉🏻पावशा पक्षी-:
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! 'पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.
👉🏻वादली पक्षी-:
कोळ्यांना वादळवाऱ्याचा संकेत देणारा वादळी पक्षी
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार, याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मासेमार त्यांच्या बोटी समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळ वारा त्याच्या पाठोपाठ येत आहे, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.
👉🏻कावळा-:
कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो हा जंगलातला अनुभव आहे. या व्कायतीरीक्त कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणाची ती नांदी असते. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे संकेत मिळू शकतात.यापुढे अजुन नोदवण्यासारखी बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस पडतो. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर दुष्काळाचे आगमन ठरते.
👉🏻चिमण्या-:
चिमण्याणी जर धुळीत लोळण्याचा खेळ सुरू केला तर समजावे लवकरच पाऊसाची शक्यता आहे.
👉🏻मोर-:
पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याच या देखण्या नाचावर लांडोर भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. हा पावसाचा पूर्वसंकेत आहे.
👉🏻टिटवी-:
टिटवी पक्ष्यांनी यावर्षी एकाच विणीच्या हंगामात दोनदा पिल्लं दिलीत.तर समजुन जा पाऊस लांबणार आहे.
जशा प्रकारे पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच काही प्राणीही संकेत देतात .
👉🏻वाघ-:
पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही वाघीन आपल्या पिल्लांना जन्म देत नाही. एवढच नाही तर पावसाची पूर्वकल्पना आल्यावर वाघीनी डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतात. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. कारण यंदा पाऊस नाही, त्यामुळे जंगलात गवत नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी पिल्ल उपाशी मरण्याची शक्यता तयार होते.
👉🏻 हरीण-:
हरीण आणि वाघ जरी एकमेकांचे शत्रु असले तरी पावसाचा संकेत मात्र एकच देतात.जर पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणीही पिल्लांना जन्म देत नाहीत.
👉🏻मासे-:
डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा व उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार याची अंदाजे चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
👉🏻खेकडे-:
शेतकऱ्याला समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून पावसाचे संकेत मिळत असतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा काळ असतो.
👉🏻मगर-:
मगरीने जलाशयाच्या बाजूच्या मातीत वा वाळूत अंडी घातल्यापासून बरोबर एकशेवीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो. अंड्यात पिलांची बिळांमध्ये वाढ होऊन मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धो धो वाहणाऱ्या पाण्याबरोबर जवळच्या जलाशयात पोहोचतात.
👉🏻वाळवी/उधई-:
जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवीला/उधई ला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते.
👉🏻 मुंग्या-:
जेव्हा काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेत असतील तर पाऊस नक्की पडतो असे समजा.
👉🏻बिळांमध्ये राहणारे प्राणी -:
बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले तर हमखास पाऊस येतो. कारण या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते.
ज्याप्रकारे पशु-पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच निसर्गातील काही झाडे झुडपेही काही संकेत देतात
👉🏻 मोरंबा किंवा बिब्याच झाड-:
मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाराह हा वृक्ष म्हणजे गोडंबा, त्यालाच कहि ठीकाणी बिब्याच झाड म्हणतात जर या झाडाला बहर येला म्हणजे हे दुष्काळाचे संकेत मानला जातो.याबरोबरच खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो.
👉🏻चिंच-:
चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुले आणि कोवळी फळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असाते.
👉🏻आंबा-:
ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतो त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.
👉🏻 मारुती चितमपल्ली यांच्या चार-पाच दशकांच्या जंगलाच्या प्रगाढ अभ्यासाप्रमाणे हरितपर्णी वृक्षांची वनं आणि शुष्कपर्णी पानगळीची जंगलं वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात.
👉🏻 ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!