काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व भारतात प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती.
नुकताच कोरोना वायरस नंतर गुरांमध्ये लंपी या रोगान थैमान घातले होते. लंपी हा त्वचाचा रोग आहे असुन यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो. हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा या रोगचे प्रमाण अधिक असते.
काय आहे लंपी विषाणू-:
👉 रोगाला कारणीभूत विषाणू -: Lumpy Skin Disease Virus (LSDV)
👉 विषाणूची प्रजाती (Genus) - Capripoxvirus
👉लंपी विषाणूचे कुल (Family) - Poxviridae ( देवी आणि मंकीपॉक्स विषाणू याच कुळातील आहेत.)
👉 हा Zoonotic विषाणू नाही. याचा अर्थ हा रोग मानवांमध्ये पसरू शकत नाही. हा एक संसर्गजन्य रोग आहे. डास, चावणाऱ्या माश्या आणि गोचिड यांसारख्या वाहकांद्वारे पसरतो. सहसा गायी आणि म्हशींसारख्या प्राण्यांना प्रभावित करतो.
👉हा रोग वाहकांच्या थेट संपर्काद्वारे किंवा दूषित चारा आणि पाण्याद्वारे पसरतो. तसेच कृत्रिम गर्भाधान (बीजारोपण) करताना प्राण्यांच्या वीर्याद्वारे पसरू शकतो.
👉 झालेल्या प्राण्याच्या 'Lymph Nodes' वर (लसिकांवर) परिणाम होतो, ज्यामुळे नोड्स वाढतात आणि त्वचेवर गुठळ्यांसारखे दिसतात. त्यामुळे या रोगास लम्पी असे नाव पडले.
लंपी विषाणूचा उगम व भारतात प्रसार -:
👉हा रोग पहिल्यांदा झांबियामध्ये १९२९ मध्ये दिसून आला.
👉नंतर बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला.
👉 त्यानंतर पश्चिम आशिया, आग्नेय युरोप आणि मध्य आशिया आणि अलीकडेच २०१९ मध्ये दक्षिण आशिया आणि चीनमध्ये पसरला.
👉FAO नुसार हा रोग सध्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, पश्चिम आशियाचा काही भाग (इराक, सौदी अरेबिया, सीरियन अरब प्रजासत्ताक) आणि तुर्कीमध्ये प्रदेशनिष्ठ रोग आहे.
👉दक्षिण आशियामध्ये प्रथम जुलै २०१९ मध्ये बांग्लादेशात पसरला.
👉 ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात पोहोचला. सुरुवातीची प्रकरणे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आली. भारतात अलीकडील प्रसार जास्त प्रसार सुरू झाला आहे.
लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव-:
👉हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार गायी व म्हशींमध्ये आढळतो.
👉 विदेशी वंशाच्या आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायींपेक्षा रोगबाधेचे प्रमाण अधिक असते .
👉 सर्व वयोगटातील (नर व मादी) जनावरात आढळतो. लहान वासरात तुलनेत प्रमाण अधिक असते.
👉 उष्ण व दमट हवामान रोगप्रसारास पोषक ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास , गोचीड, चिलटे यांच्यामार्फत होतो.
👉 आजारामुळे जनावरे अशक्त होतात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काहीवेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.
👉 त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते.
👉गाई गाबन असल्यास गर्भपात होऊ शकतो.
लंपी रोगाची लक्षणे-:
👉जर एखाद्या प्राण्याला या लंपी विषाणूची लागण झाली तर सर्वप्रथम त्या ताप येऊ लागतो आणि ते जनावर सुस्त होऊ लागते.
👉जर एखाद जनावर या विषाणूच्या पकडीत आली तर त्याच्या डोळ्यातून आणि नाकातून स्राव होतो आणि तोंडातून लाळ टपकू लागते.
👉जेव्हा गाईला हा आजार होतो तेव्हा त्या गायीची दूध देण्याची क्षमता कमी होते.
👉 जेव्हा एखादी गाय या विषाणूच्या कचाट्यात येते तेव्हा त्या गायीच्या अंगावर फोड येऊ लागतात आणि त्या युक्तीमुळे त्या गायीला खूप त्रास होऊ लागतो.
👉सतत ताप.
👉वजन कमी होणे.
👉लाळ येणे.
👉वाहणारे नाक आणि डोळे
👉दुधाची कमतरता जाणवणे.
👉वेगवेगळ्या प्रकारचे फोड्या दिसणे.
👉अंगावर पुरळ सारखे गुठळ्या.
लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय -:
👉जर एखाद्या जनावरात हा विषाणू आढळला तर त्याला बाकीच्या जनावरापासून वेगळ ठेवा जेणेकरून ती इतर प्राण्यांमध्ये पसरू नये.
👉कारण हा रोग माश्या, डास आणि कुंड्यांमुळे देखील पसरतो, म्हणून आपल्या प्राण्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवा जेणेकरून या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला येऊ नयेत.
👉ज्या वस्तूंमध्ये प्राणी अन्न खातात किंवा पाणी पितात त्या गोष्टी पूर्णपणे स्वच्छ ठेवाव्यात.
👉तुमच्या जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.
👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.
👉 जनावरांना फक्त स्वच्छ चारा द्या.
👉बाधित प्राण्याची खाण्याची व पिण्याची भांडी इतर प्राण्यांपासून वेगळी ठेवा.
👉तुमच्या आजूबाजूला संसर्गग्रस्त भाग असल्यास त्या भागातून जनावरांची ये-जा थांबवा.
👉संसर्ग झालेल्या प्राण्याभोवती जंतू मारणाऱ्या रसायनाची फवारणी करा.
👉लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जनावराचा नमुना घेत असताना त्या वेळी तुम्हालाहि काळजी घ्यावी लागेल
लम्पी त्वचा रोगावर कोणतीही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते.म्हणुन होण्यापूर्वीच सावधान राहणे गरजेच आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!