जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)

 जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)





सलोखा योजना मराठी माहिती.सलोखा योजना पात्रता काय आहे.सलोखा योजना अटी व शर्तीं.सलोखा योजना अर्ज प्रक्रिया मराठी माहिती. 

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 50%पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. करोना सारख्या महामारीत सर्व क्षेत्र बंद असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरुन धरले होते.एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मालकी हक्काचे वाद, शेत बांदाचे वाद, जमिनीचा ताबावाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, हस्तांतरणाचे वाद, भावंडाच्या वाटणीवरुन वाद, शासकीय नियोजनातील चुका यातुन उद्भवलेल वाद यां वादामुळे समाजात वातावरण दुषीत होत आहे. हे  शेताचे वाद अतीशय गुंतागुंतीचे व वेळाखाऊ असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू होतो. आता यातुन सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना नावाने एक योजना 3 जानेवारी 2023 पासून आणली आहे.अशा करुयात की या योजनेच्या नीमीत्ताने का होईना हे वाद संपतील.

सलोखा योजनेची अवश्यकता का आहे-:

पूर्वीच्या जमीनीचे छोटेछोटे सर्वे नंबर होते म्हणजे 1 गुंटे 2 गुंटे असे होते.त्यानंतर आणखी कुटुंब वाडत गेली व जमीनीचे आणखी लहान लहान तुकडे झाले परीणामी शेती मोजनी अडचणीचे झाले हि अडचण लक्षात घेता सरकारने 1947 साली कायदा करुन हे सर्वे नंबर एकत्र करुन काही मानके निश्चित करण्यात आली व गट नंबर देण्यात आले. याचा परीणाम असा झाला की शेती एक झाली परंतु  शेतीच्या ताब्यात घेण्यावरुन गोंधळ निर्माण झाला व शेती एकाच्या नावावर व वहीवाट करणारा दुसरा अशी परस्थिति झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जमीनीची वाटणी करत असताना जमीन नावावर एकाच्या आणी त्याची वहिवाट सोईनुसार दुसर्याकडे देण्यात आली पण नंतर आता पुढच्या पीढीत यावरून वाद निर्माण झाले आहेत. हे वाद सोडवणे आवश्यक होते म्हणून ही योजना आणावी लागली.


सलोखा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -:

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित वाद मिटविण्यासाठी त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल, आणि अर्ज सादर करावा लागेल. या योजने अंतर्गत जमीन एकाकडे व ताबा दुसर्याकडे अशा जमीनीचे व्यवस्थाीकरण करण्यासाठी नाममात्र 1000 रु शुल्क व नोदणी फी 1000 रुपये अकारुन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. 

सलोखा योजनेचे निकष व अटी-:


👉🏻 हि योजना फक्त वाद मिटविण्यासाठी आहे इतर व्यापारी उद्देश्यासाठी नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचनामा अर्ज गावच्या तलाट्याकडे करावा लागेल. 

👉🏻तलाट्याला अर्ज प्राप्त झाल्यावर 15 दिवसाच्या आत पंचनामा करवा. 

👉🏻पंचनामा करताना दोन सज्ञान व्यक्तिचा पंचनामा नोंदवहीत नोदवणे गरजेच आहे.

👉🏻सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटातील सगळ्या शेतकऱ्यांची नोंदणीस संमती लागेल. ती नसल्यास अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.

👉🏻या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंद व ताबा यांची अदलाबदल  किमान 12 वर्षांपासून असला पाहिजे.

👉🏻हि योजना पुढच्या 2 वर्षापर्यांत चालु राहील.

👉🏻नोदणी शुल्क अगोदर भराणे गरजेच आहे. 


सलोखा योजनेचे फायदे -:

👉🏻या योजनेचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे नाममात्र 1000 रुपये शुल्का आकारुन जमीनीचे व्यवस्थाीकरण म्हणजे अदल-बदल  करण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा आहे. 

👉🏻नंतर दुसरा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमीनीचे वाद या योजनेने संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

👉🏻खेडे गावात जमीन या मुद्द्यावर खुप वाद होतात ते वाद संपतील व समाजात शांतता रहण्यास मदत होईल.

👉🏻आपली जमीन आपल्या मालकीची आपल्या ताब्यात असेल तर सपाटीकरण व सींचन यासारख्या मूलभूत सुधारना करु शकतो.

👉🏻कर्ज मीळवणे सोपे जाते

👉🏻आपल्या नावावर असणारीच जमीन आपल्या ताब्यात असेल तर भविष्यात निर्माण होणार्यां वाद  अधिच मीटु शकतात.






शेतकरी बांधवांनो शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकार राबवते,पण त्या योजनेचा लाभ हा शेतकरी पात्र असतानाही मीळु शकत नाही.याच कारण म्हणजे शेतकऱ्यांना या योजनाबाबत माहिती नसते. आपन आपल्या marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना या अज्ञाना पासुन दुर करुन ज्या शेतकरी बांधवाना  या योजनेची गरज आहे. त्याना त्या योजनेचा लाभ मीळवुन देण्यासाठी मदत करत आहोत. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या