आर,गुंठा,एकर,हेक्टर,बिघा,म्हणजे कीती?

आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.



शेतकर्‍यांचा संबंध येणारा सर्वात महत्वपूर्ण कागद म्हणजे ७/१२ उतारा,तो उतारा वाचत असताना आपण काही शब्द बघतो ते म्हणजे आर,गुंठा, त्याच बरोबर इतरही शब्द तुमच्या कधी न‌ कधी कानावर पडले असतील जसे की एकर,हेक्टर,बिघा  हे शब्द वाचतान तुम्हालाही कधी-कधी प्रश्न पडत असेल नेमक हे शब्द आहेत काय हे कसे तयार झाले . चला तर मग या लेखा मधुन आपण समजुन घेऊया,आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.आर,गुंठा,एकर,हेक्टर,बीघा म्हणजे काय ?






खरं तर हे आर, गुंठा, एकर, हेक्टर, बिघा हे जमीन मोजण्याची एकके आहेत.

आर म्हणजे काय -:


आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. यामध्ये काय करतात तर जमीनीच मोजमाप मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.

गुंठा म्हणजे काय -:



पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत होती  त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.

गुंठा : १ गुंठा जमीन = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
 

एकर म्हणजे काय -:


एकर हे जमिन मोजण्याचे आपल्याकडील प्रसिद्ध एकक आहे.

 १ एकर = ४०४६.८७२६ चौरस मीटर.

 १ एकर = ४० गुंठे. 

 म्हणजेच  १ एकर जमीन = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर ( साधारणत: चाळीस गुंठे म्हणजे एक एकर)


अशा प्रकारे एक एकर तयार होतो.


हेक्टर म्हणजे काय-:



आपल्याकडे जमीन किंवा शेत जमीन ही हेक्टर मध्ये मोजली जाते. ४० गुंठ्यांचा मिळून १ एकर बनतो. १ गुंठा ३३ बाय ३३ फुटांचा असतो. एक हेक्टर म्हणजे किती एकर याचं उत्तर २.४७ एकर होय. याचाच अर्थ की ९८.८ गुंठा जमीन म्हणजे १ हेक्टर होय. १०००० चौरस मीटर चा एक हेक्टर होतो.

थोडक्यात हेक्टर (हे.) = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर (अडीच एकर म्हणजे एक हेक्टर) शंभर गुंठे किंवा शंभर आर म्हणजे एक हेक्टर (आर - हा शब्द 7/12 वर वापरला जातो)


बिघा म्हणजे काय -:


बघा हा शब्द भारतीय बोलीभाषेत आहे.पण प्रत्येक प्रदेशातील ठिकाणानुसार त्याचं परिमाण बदलतं

👉 बिहार मध्ये एक बीघा म्हणजे 2529.2 वर्ग मीटर

 👉राजस्थान मध्ये 2500 वर्ग मीटर

 👉बंगाल मध्ये. 1333.33 वर्ग मीटर

 👉आसाममध्ये 14,400 चौरस फूट (1337.8 चौरस मीटर).

 👉महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा (आर), एकर, हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत.

थोडक्यात काय तर -:
 
1 हेक्टर = 10000 चौ. मी. 1 एकर = 40 गुंठे.

1 गुंठा = [33 फुट x 33 फुट ] =

1089 चौ फुट.

1 हेक्टर = 2.47 एकर = 2.47 x 40 =

98.8 गुंठे.

1 आर = 1 गुंठा.

1 हेक्टर = 100 आर.

1 एकर = 40 गुंठे x [33 x 33] =

43560 चौ फुट.

1 चौ. मी . = 10.76 चौ फुट .

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या