भोगवटादार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची वर्ग 1 मध्ये कशी आणायची? करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.
भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय?
जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार असतो. त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा आणि ती जमिन बक्षीसपात्र म्हणुन देण्याचे पूर्ण अधिकार बहाल केलेल असतात. अशा जमीनींचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री व हस्तांतरणासाठी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते . ही मालकीची वडलोपार्जीत आलेली जमीन असते.
भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय?
जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार तर असतो. पण त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार नसतं त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतनाच्या जमीन, वनजमीन, गायरान, पुनपुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो.
👉भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनातर्फे शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी या जमिनीबाबत व्यवहाराचे अधिकार नसतात. म्हणजेच या जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी जर भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.
भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत कशी करावी?
भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या भावाच्या आर्धी (50%) रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.(अर्थीत शासनकडुन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येते.) वर्ग 2 ची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन(प्रत्यक्ष) पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो .तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळते.
भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-
👉जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज.
👉 जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा.
👉विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.
👉7/12 व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी.
👉आकरबंदाची मूळ प्रत.
👉एकत्रीकरनाचा मूळ उतारा.
👉मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत
कबुलायत.
👉तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा.
#भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधील सवलतीला 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.
👉 तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!