Showing posts with label कायदे विषयक. Show all posts
Showing posts with label कायदे विषयक. Show all posts

ग्राम पंचायतीची कामे

ग्राम पंचायत हे खरे तर गाव स्तरावर लोकशाही पद्धतीने चालवणारे आणि सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करणारे सर्वात लहान संस्था आहे. गावाचा कारभार सांभाळणारी ही मुख्य संस्था आहे. ग्रामपंचायत माहिती आपण पाहात आहोत.त्याचे सदस्य आणि सरपंच निवडण्यासाठी ग्राम स्तरावर निवडणुका घेतल्या जातात. यामध्ये लोक मतदान करतात आणि पंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्डातुन सदस्य व सरपंच निवडुन येतात. ही निवडणूक 05 वर्षांसाठी असते. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक प्रकारची कामे केली जातात, ज्यामध्ये काही मुख्य कामे आपण ग्रामपंचायतीची कामे 2023 (grampanchyt kame in marathi 2023) येथे पाहणार आहोत. चला तर मग पाहुया.
    




ग्रामपंचायतीची कामे :-


जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या वित्तीय मर्यादेत ग्रामपंचायतीला प्रामुख्याने खालील कार्ये करावी लागतात.


१) आरोग्यविषयक कार्ये :-

 

 👉पिण्याच्या पाण्याची व तसेच जनावरांसाठी पाण्याची सोय करणे.

 👉 सार्वजनिक विहीर, रस्ते, गटारी इ. स्वच्छ ठेवणे.त्यांची विल्हेवाट लावणे, जेणेकरून आरोग्य अबाधित राहील..

👉 आरोग्याविषयी उपद्रवी गोष्टी थांबविणे तसेच मेलेली जनावरे गावाबाहेर पाठवून 

👉 स्मशानभूमीची योग्य प्रकारे व्यवस्था करणे. 

👉 बागा व खेळाच्या मैदानाची व्यवस्था करणे.

👉 सार्वजनिक मुतार्यां बांधणे.

👉 गावातील केरकरचना, अस्वच्छ खड्डे, गटारी व नाल्या इ. साफ करणे.

👉 बाल आरोग्यासंबंधी काळजी घेणे.


२) बांधकामविषयक कार्ये :-


👉 दिवाबत्तीची सोय करणे.

 👉सार्बजनिक रस्ते, गटारी, बांध, पूल इ. बांधणे व त्याची दुरुस्ती व देखरेख करणे. 

👉 बाजार टांगा व बैलगाडी स्थानकावर नियंत्रण ठेवणे.

 👉 खाटीकखान्याचे बांधकाम व देखरेख करणे.

👉 रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावणे आणि त्याच्या वाढीसाठी आवश्यक गोष्टी करून योग्य  प्रकारे जोपासना करणे.

👉 धर्मशाळा, कपडे धुण्याचे घाट, बाजारपट्टी बांधणे इ.

👉 शिक्षणाचा प्रसार करणे.

👉 व्यायामशाळा व करमणुकीची साधणे उपलब्ध करू देणे. 

 👉कला आणि संस्कृती यांची जोपासना करणे.

👉 सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाची व्यवस्था करणे.

 👉 गावातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कल्याणकारी कार्य हाती घेणे.

 उदा. गावात नशाबंदीसाठी प्रयत्न करून भ्रष्टाचार नाहीसा करणे. प्रौढ शिक्षणास उत्तेजन देणे. शेतीविषयक शिक्षण व माहिती देणे.


४)संरक्षणविषयक कार्ये :-


 👉गावाचे संरक्षण तसेच शेतीतील पिकांचे संरक्षण करणे इ.

👉 व्यापार व धान्यापासून जर नागरिकाच्या जीवनाला धोका होत असेल तर त्यावर कडक नियंत्रण ठेवणे.

👉 आगीपासून नागरिकाच्या जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे इ.


५) प्रशासनासंबंधी कार्ये :-


👉 गावातील वॉर्डाना व घरांना क्रमांक देणे.

👉 शेती व बिनशेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम ठरविणे. 

👉 ग्रामीण विकास योजना राबविण्यासाठी आवश्यक त्या पैशाची मागणी करणे. 

 👉केंद्र व राज्य सरकारने स्वीकृत केलेले पैसे गावाच्या विकासासाठी आणून ते योग्य प्रकारे खर्च करणे.

👉 विकास कार्याचे सर्वेक्षण करणे.

👉 विकास योजना तयार करणे.

👉 गाव मालकीची जमीन, बाजारपेठ, यात्रेकरू इ. वर नियंत्रण ठेवणे. 

👉 पंचायतीची सर्व कागदपत्रे तयार करून ठेवणे.

👉 गावातील लोकसंख्येची पर्यायाने जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे.


 आणखी वाचा >> FIR व NCR मधील फरक


६) कल्याणकारी कार्ये :-


👉 जमीन सुधारणासंबंधी कार्यात राज्य सरकारच्या अंमलबजावणीत मदत करणे. 

👉 अपंग, आजारी किंवा दारिद्री लोकांना मदत करणे.

👉 नैसर्गिक आपत्तीस त्रासलेल्या लोकांना मदत करणे.

👉 पडीत जमीन राज्य सरकारच्या परवानगीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन तिचा शेतीसाठी उपयोग करणे.

👉 गावातील लोकांचे सहकार्य घेऊन श्रमदानाने रस्ते तयार करणे व अशा कार्यातून ग्रामविकासात भर टाकणे.

👉 स्वस्त धान्याची दुकाने उघडणे.


७) शेतीविषयक कार्ये :-


👉 शेती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे व त्यात आदर्श शेती कशी बनविता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधणे. 

 👉धान्याचे कोठार बांधणे.

👉 शेती उत्पादनात किमान स्तर आणण्यासाठी प्रयत्न करणे. 

👉शेतीला  आवश्यक अशा नैसर्गिक खताचे रक्षण करणे. कंपोस्ट खते तयार करून त्याची विक्री करणे.

👉 सुधारित बी-बियाणे, कीटकनाशक औषधी आणि शेती उपयोगी शास्त्रीय अवजारांची माहिती शेतकऱ्यांना देणे.

👉गायरान व वनांचे संरक्षण करणे.


८) इतर कार्ये : :-

👉 गावातील जनावरांचे रक्षण करणे आणि चांगल्या जनावरांची पैदास करण्यासाठी मदत करणे.

 👉गावात लहान लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे.

 👉 जमीन महसूल जमा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास मदत करणे व जमिनीचे योग्य रेकॉर्ड ठेवणे.

👉 ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आखलेल्या धोरणानुसार इतर कार्य करणे.

 👉 प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली मालमत्ता लिजवर देण्याचा किंवा विकण्याचा अधिकार असतो. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची पूर्वपरवानगी अत्यावश्यक आहे.

वरील विविध स्वरूपाची कामे ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत करत असते.


आणखी वाचा >> पोलीस पंचनामा म्हणजे काय 


अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

Share:

पोलीस पंचनामा

पोलिस पंचनामा म्हणजे काय व पंचनाम्याचे प्रकार. पोलिस पंचनामा कसा करतात. पंचनाम्यात काय असते ? पंचनामा का करतात ?

    


पोलिस तपासातील पंचनामा हा महत्त्वाचा भाग आहे. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती मिळविण्याच्या दृष्टीने पंचनामा महत्त्वाचा मानला जातो. पंचनामा म्हणजे घडलेल्या अपराधाची सर्व माहिती सांगणारा महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. गुन्हा नेमका काय होता ,गुन्हा कोठे घडला, कसा घडला, केव्हा घडला आणि का घडला या सर्व प्रश्नांचे उत्तर पंचनाम्यामध्ये मिळून येते. पंचनाम्याचे पुढील पाच प्रकार असतात . तपासाच्या वीवीध टप्प्यावर पंचनामा करण्यात येतो चला तर मग आपण पाहुया कोणकोणत्या प्रकारचा पंचनामा असतो. पंचनाम्यात काय असते.पोलिस पंचनामा का करतात.पंचनाम्याचे प्रकार किती व कोणते.अशा अनेक प्रश्नाची उत्तरे यामध्ये पाहुया 


घटनास्थळ पंचनामा-:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 157(1) या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही दखलपात्र अपराध घडल्यानंतर पोलीस अधिकारी त्याची नोंद करून शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी घटनास्थळी . घटनास्थळी पाहिलेल्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी घटनास्थळ पंचनामा करण्यात येतो. ज्या ठिकाणी अपराध घडला आहे तेथील निश्चित स्थानाचे आकलन होण्याच्या दृष्टीने घटनास्थळ पंचनामा महत्त्वाचा आहे. या पंचनाम्यात घटनेचे निश्चित स्थान, भौगोलिक स्थान तसेच स्थावर व भौतिक वस्तू, दिशा यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळते. तसेच घटनास्थळावर अपराधाच्या तपासाच्या दृष्टीने पुरावा म्हणून उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून या वस्तू पंचाच्या सहीने ताब्यात घेता येतात. अपघात किंवा इतर प्रसंगात घटनास्थळाचा पंचनामा करतांना मोजमाप घेवून इतर अधिकाऱ्यांकडून नकाशा तयार करतात. असा नकाशा, चित्र, टीपा यांचेसह हा पंचनामा न्यायालयात पुरावा म्हणून हजर करता येतो. या पंचनाम्याचे खुप महत्व असते.


अटक पंचनामा किंवा अंगझडती पंचनामा -:

हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 51 व 52 या कलमान्वे करण्यात येतो. कोणताही अपराध घडल्यानंतर त्या अपराधाच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीस अटक करतात. अटक केल्यानंतर त्या व्यक्तीची अंगझडती घेतली जाते त्यालाच अटक पंचनामा असे म्हणतात. यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला तिला अटक का केली, कुठे केली, कशाबाबत केली याची माहिती देण्यात येते. तसेच त्या व्यक्तीच्या अंगावरील जखमा, व्रण, चीजवस्तू यांचा उल्लेख करण्यात येतो. त्या व्यक्तीजवळ आढळून आलेल्या वस्तू पंचाच्या सहीसह ताब्यात घेतल्या जातात. त्या वस्तू त्या व्यक्तीला नंतर परत करता येतात. परंतु पुरावा म्हणून उपयोगी पडणाऱ्या वस्तू, हत्यारे किंवा इतर संशयास्पद वस्तूंचा पंचनाम्यात उल्लेख करून त्या वस्तु जप्त करण्यात येतात. महीला आरोपी असतील तर महीला पंचाची आवश्यकता असते.


मालमत्ता पंचनामा -:

 हा पंचनामा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 165(1) व कलम 100(5)या कलमान्वे करण्यात येतो. या पंचनाम्यामध्ये  वेगवगळ्या  प्रकारच्या अपराधांमध्ये मुद्देमाल किंवा चीजवस्तू जप्त केल्या जातात. अशा अपराधांमध्ये तसेच उघड्या जागेवर पडलेला माल, बेवारस वस्तू, गुन्ह्याच्या पुराव्यासंबंधीचे हत्यार, चोरीचा माल, प्रेत अशा अनेक प्रकारच्या वस्तू मालमत्ता पोलीस तपासासाठी ताब्यात घेतात. अशावेळी याठिकाणी जप्त केलेल्या मालाचा पंचनामा करण्यात येतो. यामध्ये त्या वस्तूचे, मालमत्तेचे नाव, वर्णन करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेतल्या जातात.


इन्क्वेस्ट पंचनामा-:

एखाद्या व्यक्तीचा अकस्मात, संशयास्पद किंवा अपघातात मृत्यू झाला तर तिच्या मृतदेहाचा पंचनामा करतात. या पंचनाम्यास इन्क्वेस्ट पंचनामा असे म्हणतात. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 (1) प्रमाणे मरणोत्तर चौकशी करण्यात येते. या कलमाप्रमाणे करण्यात येणाऱ्या पंचनाम्यामध्ये मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे वर्णन, तिच्या शरीरावरील खुणा, व्रण तसेच तिच्या अंगावरील चीजवस्तू तसेच अंगावर दिसत असलेल्या जखमा, मृतदेहाच्या आसपास मिळून आलेल्या वस्तू, हत्यार याची माहिती देण्यात येते. मृतदेहाच्या जवळपास सापडलेल्या वस्तू पुरावा म्हणून उपयोगात येतात. म्हणून त्या सर्व वस्तू व हत्यार यांचा पंचनामा करून त्यावर पंचाच्या सह्या घेवून ताब्यात घेण्यात येतात. इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यास आहे. हा पंचनामा केल्यानंतर मृतदेह वैद्यकीय शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठविण्यात येतो. अशा प्रकारे इन्क्वेस्ट पंचनामा करतात.


 मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा-:

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 27 प्रमाणे मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा करण्यात येतो. अटक केलेल्या आरोपीने त्या गुन्ह्याशी संबंधित एखादे हत्यार किंवा वस्तू किंवा मुद्देमाल काढून दिल्यानंतर त्यासंबंधी आरोपीने केलेले निवेदन पंचासमोर लिहून घेतात. त्यालाच मेमोरंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा असे म्हणतात. या पंचनाम्यावर आरोपी, पंच, पोलीस अधिकारी यांची सही असते. आरोपीने निवदेन पंचनामा लिहून दिल्यानंतर तो सांगेल त्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन तेथे आढळून येणाऱ्या वस्तू, हत्यार ताब्यात घेता येतात. ताब्यात घेतल्यानंतर त्यावर पंचाच्या सह्या घेण्यात येतात. याला मेमोरंडम पंचनामा असे म्हणतात. 

आणखी वाचा >> FIR व NCR म्हणजे काय? 


अशा प्रकारची कायद्यासंबधी महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा .तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर वेबसाईटवर येत चला.

Share:

FIR v/s NCR


FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात.


     


आपल्यासारखा  सामान्य माणुस पोलीस व पोलिस चौकी या पासुन ४ हात लांब राहणे पसंत करतो.पण तरीही बहुतेक लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पोलिस स्टेशन बरोबर संबंध येतच असतो.आणी मग आपल्या कानावर काहि शब्द पडतात. त्यातील महत्वाचे शब्द म्हणजे FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) यातील NCR(एन सी आर) याला आपल्या बोली भाषेत फक्त NC (एन सी) एवढच म्हटलं जातं . गुन्हा घडल्यानंतरची न्याय मीळण्याची पहिली पायरी म्हणजे गुन्ह्याची नोद करणे. गुन्हा नोंदवताना आपल्याला काहि गोष्टी माहित असणे आवश्यक असते.जसं की FIR (एफ आय आर) म्हणजे काय? NCR (एन सी आर) म्हणजे काय? FIR (एफ आय आर) व NCR (एन सी आर) याध्ये फरक काय असतो.FIR कशी नोंदवतात. यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे या लेखामधुन आपण पाहणार आहोत. चला मग पाहुया.


FIR (एफ आय आर)  म्हणजे काय व कसा नोंदवतात-:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 154 अन्वये पोलिस वर्दी देणाऱ् व्यक्तिने प्रथम दिलेली माहिती पोलीस लीहुन घेतात त्यालाच FIR (FIRST INFORMATION REPORT ) प्रथम माहिती अहवाल असे म्हणतात.दखलपात्र अपराध घडल्याची वर्दी पोलीस ठाण्याच्या अंमलदारास लेखी व तोंडी देण्यात आली असेल तर, तो ती लिहून घेईल. वर्दी देणाऱ्याला वाचून दाखवण्यात येईल. त्यावर वर्दी देणाराला सही करावी लागेल.सही करता येत नसेल तर अंगठा करावा पण अगोदर आपण जी माहिती दिली ती सांगीतल्या प्रमाने असल्याची खात्री करावी व नंतरच अंगठा किंवा सहि करावी अन्यथा करु नये. नंतर पोलिस ती वर्दीची नोंद राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात व विहित अधिकाऱ्याने ठेवावयाच्या पुस्तकात केली जाईल.

परंतु भारतीय दंड संहीता १८६० चे 
कलम ३२६अ, ३२६ब-अँसिड हल्ला
 कलम ३५४ ते ३५४ड- विनयभंग
कलम ३७६ ते ३७६इ-बलात्कार
कलम ५०९ - हावभाव व अवाज करुन विनयभंग 

या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेल्या स्त्रीने वर्दी दिली असेल तर ती वर्दी महिला पोलिस अधिकाऱ्याकडून किंवा अन्य महिला अधिकाऱ्याकडून लिहून घ्यावी.
जर या कलमातील अपराध किंवा त्याचा प्रयत्न जिच्या बाबतीत घडल्याचे कथित असलेली स्त्री दिव्यांग असेल तर पोलिस अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानी व तिच्या सोयीच्या ठिकाणी दुभाषाच्या व विशेष शिक्षण देणाऱ्याच्या उपस्थित ती वर्दी लिहून घ्यावी.
FIR प्रथम खबर नोंदवलेल्या माहितीची प्रत वर्दी देणाऱ्यास त्वरित विनाशुल्क दिली जाते.

पोलिस FIR फाडण्यास पोलिस टाळाटाळ केल्यास काय करावे -:


प्रथम खबर नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याने नकार दर्शवल्याने नाराज झालेली व्यक्ती ती माहिती लिखित स्वरूपात व टपालाने संबंधित ( SP ) पोलिस अधिक्षकाकडे पाठवू शकते. त्या माहितीने दखलपात्र अपराध उघड झाल्याबाबत पोलिस अधीक्षकाची खात्री झाल्यास एकतर तो स्वतः तपास करील अन्अयथा धिनस्थ अधिकाऱ्याकडून तपास करण्याचा आदेश देईल.

NCR (एन सी आर) म्हणजे काय -:

दखल पात्र अपराध घडल्यावर भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 155 नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदारास त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अदखलपात्र अपराध घडल्याची वर्दी देण्यात आली असेल तेंव्हा, तो अधिकारी राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात ठेवावयाच्या पुस्तकात त्या वर्दीच्या नोंद करील वा करवील शिवाय त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे पाठवील. कारण यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस क्रृती करतात स्व:ता दखल देण्याचा अधिकार नसतो.
अदखलपात्र प्रकरणाचा तपास कोणताही पोलिस अधिकारी त्या खटल्याची संपरीक्षा करण्याचा व तो खटला संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय करणार नाही. न्यायालयाकडून तपासाचा आदेश मिळालेला पोलिस अधिकारी हा पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी दखलपात्र प्रकरणात वापरू शकत असलेले अधिकार वापरू शकतो.

तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करुन सांगा व आमच्या marathimahiti17.blogspot.Com यावर येत चला.






Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels