![]() |
स्वामी रामानंद तीर्थ -: हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून केलेल कार्य व मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी थोडक्यात माहिती
👉 हैदराबाद जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानचे नव्हते.त्यांचे मूळ गाव सिंदगी जि. विजापूर हे होते.
👉 जन्म -:3 ऑक्टोबर 1903
👉आईचे नाव -:लक्ष्मीबाई
👉वडिलाचे नाव-:भगवान
त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते
👉 शिक्षण-:स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोर्ट या सरकारी शाळेत झाले.असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. 'पारंगत' ही एम. ए.च्या समकक्ष पदवी त्यांनी मिळवली होती.1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली.
👉 चळवळीत प्रत्यक्ष सहभाग-:1935 साली हिप्परग्याची शाळा सोडून स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी आंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरूज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून देऊन राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घ्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच व नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे पाच जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निझामाबादच्या तुरुंगात ठेवले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागिरदारी, सरंजामदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कूळ कायदा अंमलात आला, याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.. कम्युनिस्ट पक्षाने सरकार पाडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमीकाव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध केला होता पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.
👉राजकरणातील सहभाग-:1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामीजी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.
👉1967 साली आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओमकारांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी त्यानी चालवला.
👉निधन-:22जानेवारी1972 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हैद्राबाद येथे प्राणज्योत मालवली. हैद्राबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!