Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

96 कुळी मराठा अडनाव यादि मराठी 96 kuli adnav yadi in marathi

96 कुळी अडनाव यादि मराठी 96 kuli adnav yadi in marathi 




 96 कुळी मराठा असे आपण सारखे ऐकतो. पण हे 96 कुळ कोणती आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये कोणती- कोणती आडनावे येतात त्याची यादि आपण पाहणार आहोत. चला तर मग 96 कुळी अडनाव यादि96 कुळात कोणती आडनावे येतात ते पाहुया. 


1.. यादव/जाधव


२. मोरे


३. भोसले


४. सिसोदे


५. चव्हाण


६. शेलार


७. कदम


८. राठोड


९. चालुक्या


१०. साळुंके


११.. शिंदे


१२. सावंत


१३. सालव/साळवी


१४. लाड


१५. निकम


१६. अहिर


१७. गंगनाईक


१८. पवार


१९. गायकवाड


२०. मोहिते


२१.काळचुरी


२२. महाडिक


२३. माने


२४. चुळखे


२५. आंग्रे


२६. चांदळे


२७. काकडे


२८. राणे


२९. घाटगे


३०. जगताप


३१. ढमढेरे


३२. जगदाळे


३३. धावळे


३४. दाभाडे


३५. धुमाळ


३६. थोरात


३७. दळवी


३८. नलावडे


३९. पानसरे


४०. पिसाळ


४१. मालाप


४२. फाळके


४३. आंगणे


४४. विचारे


४५. मालसुरे


४६. तावडे


४७. खैरे


४८. बागवे


४९. राऊत


५०. रेणुसे


५१. वाघ


५२. पांढरे


५३. भोगळे


५४. बागराव


५५. भागवत


५६. मुळीक


५७. सुर्वे


५८. क्षीरसागर


५९. शितोळे


६०. ठाकूर


६१. शंकपाल


६२. शिर्के


६३. तुवर


६४. माधुरे


६५. महामबार


६६. बांडे


६७. तेजे


६८. देवकाते 


६९. सांभारे


७०. फाडके


७१. हरपळे


७२. दरबारे


७३. कोकाटे


७४. ढेकळे


७५. थोटे


७६. परते


७७. पलांडे


७८. पाठक


७९. जगदाने


८०. धायबर


८१. पिंगळे


८२. फडतरे


८३. भोवरे


८४. रसाळ


८५. खडतरे


८६. धागे


८७. ढोने


८८. मिसाळ


८९. पठारे


९०. बाबर


९१. भोईटे


९२. गव्हाणे


९३. गवासे


९४. ढमाले


९५. पळाव


९६. खंडागळे


 आणखी वाचा>> पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात.


आणखी वाचा>> लंपी विषाणू लागण,कारणे,प्रादुर्भाव,उगम,प्रसार मराठी माहिती.


आणखी वाचा>> आधार कार्ड अपडेट आणी डाउनलोड (adhar card update and download)


वरी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व इतराना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी marathimahiti17.blogspt.com या वेबसाईटला भेट देत चला.

Share:

स्वामी रामानंद तीर्थ-हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार

स्वामी रामानंद तीर्थ -: हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून केलेल कार्य व मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी थोडक्यात माहिती 

👉 हैदराबाद जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानचे नव्हते.त्यांचे मूळ गाव सिंदगी जि. विजापूर हे होते.

👉 जन्म -:3 ऑक्टोबर 1903

👉आईचे नाव -:लक्ष्मीबाई

👉वडिलाचे नाव-:भगवान 

 त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. ते प्राथमिक  शाळेत  शिक्षक होते

👉 शिक्षण-:स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोर्ट या सरकारी शाळेत झाले.असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. 'पारंगत' ही एम. ए.च्या समकक्ष पदवी त्यांनी  मिळवली होती.1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली.

👉 चळवळीत प्रत्यक्ष सहभाग-:1935 साली हिप्परग्याची शाळा सोडून स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी आंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरूज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून देऊन राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घ्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच व नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे पाच जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निझामाबादच्या तुरुंगात ठेवले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागिरदारी, सरंजामदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कूळ कायदा अंमलात आला, याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.. कम्युनिस्ट पक्षाने सरकार पाडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमीकाव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध केला होता पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.

👉राजकरणातील सहभाग-:1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामीजी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.

👉1967 साली आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओमकारांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी त्यानी चालवला.

👉निधन-:22जानेवारी1972 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हैद्राबाद येथे प्राणज्योत मालवली. हैद्राबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे.




Share:

रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास.Ravrambha nibalkar mahiti


मराठा इतिहासातील प्रतिष्ठित समजल्या रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास यांच्या विषयी थोडक्यात माहिती आपण येथे पाहणार आहोत.

रंभाजी  निंबाळकर कोन होते? 

  फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांचे पुत्र महादजी व महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर.निजामशाही स्थापन करण्यात रंभाजींची मोठी भूमिका होती. त्यामुळे निजामने रंभाजींना 1724 साली  "रावरंभा " ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जावू लागले . रावरंभा या शब्दाचा अर्थ होतो सतत जिंकणारा. रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे.

रंभाजींचा जन्म-:

फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे साक्षात शिवरायांचे जावई. संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली.

रावरंभा इतिहास कथा 

आपल्या इतिहासात जरी हे पान समोर आले नसले तरी देखील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. छत्रपती घराण्याच्या सोबत निंबाळकर घराणे देखील प्रसिद्ध होते. निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत लढाया केल्या आहेत. १७०७ साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादी वर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजाचा सातारा व ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.
           मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या अंतर्गत वादाला कंटाळून हैद्राबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात होते रंभाजी निंबाळकर. हैद्राबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणे. त्यांच्या पराक्रमाने खुश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा भूम बारामती तुळजापूर इथली जहागिरी दिली .

रावरंभा व कमला भवानी मंदिर करमाळा-:

रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक होते. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.रावरंभा घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनौरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो.
असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती. त्यामुळे 96 या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व आहे. मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्रे लावलेली आहेत. 96 खांबी मंदिर, मंदिराच्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांमधील 96 कमानी, शिखरावरील 96 शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 96 हा अंक शहाण्णव कुळी मराठा समाजातील 96 कुळाशी संबंधित असून तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नाते जोडणारा आहे.

रंभाजींचा  मृत्यू-:

अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा (सोलापुर)याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे.त्यांच्या मृत्युची तारीख 17 नोव्हेंबर 1736 म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे.



 


Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels