रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास.Ravrambha nibalkar mahiti


मराठा इतिहासातील प्रतिष्ठित समजल्या रंभाजी निंबाळकर व रावरंभा घराण्याचा इतिहास यांच्या विषयी थोडक्यात माहिती आपण येथे पाहणार आहोत.

रंभाजी  निंबाळकर कोन होते? 

  फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांचे पुत्र महादजी व महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर.निजामशाही स्थापन करण्यात रंभाजींची मोठी भूमिका होती. त्यामुळे निजामने रंभाजींना 1724 साली  "रावरंभा " ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जावू लागले . रावरंभा या शब्दाचा अर्थ होतो सतत जिंकणारा. रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे.

रंभाजींचा जन्म-:

फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे साक्षात शिवरायांचे जावई. संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली.

रावरंभा इतिहास कथा 

आपल्या इतिहासात जरी हे पान समोर आले नसले तरी देखील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. छत्रपती घराण्याच्या सोबत निंबाळकर घराणे देखील प्रसिद्ध होते. निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत लढाया केल्या आहेत. १७०७ साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादी वर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजाचा सातारा व ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.
           मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या अंतर्गत वादाला कंटाळून हैद्राबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात होते रंभाजी निंबाळकर. हैद्राबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणे. त्यांच्या पराक्रमाने खुश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा भूम बारामती तुळजापूर इथली जहागिरी दिली .

रावरंभा व कमला भवानी मंदिर करमाळा-:

रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक होते. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.रावरंभा घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनौरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो.
असं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती. त्यामुळे 96 या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व आहे. मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्रे लावलेली आहेत. 96 खांबी मंदिर, मंदिराच्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांमधील 96 कमानी, शिखरावरील 96 शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 96 हा अंक शहाण्णव कुळी मराठा समाजातील 96 कुळाशी संबंधित असून तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नाते जोडणारा आहे.

रंभाजींचा  मृत्यू-:

अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा (सोलापुर)याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे.त्यांच्या मृत्युची तारीख 17 नोव्हेंबर 1736 म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे.



 


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!