Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts

पॅन कार्ड आधारला लिंक नसेल तर हेे तुमच्यासाठी आहे.

 पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे.pancard link to adhar card marathi mahiti


पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांमध्ये या दोन्ही गोष्टी अनिवार्यपणे आवश्यक आहेत, तुम्ही त्यांच्याकडून अनेक सरकारी फायदेही मिळवू शकता, त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2023 आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.व तुम्ही पँनकार्ड चा वापर करु शकणार नाही त्यामुळे तुमच पँन आधार कार्डशी  लिंक आहे का नाही हे आम्ही तुम्हाला या पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती  पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे मराठी माहिती येथे येत आहोत चला तर मग पाहुया .

     


पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे कळेल?

तुम्हाला आधार-पॅन लिंक स्थिती तपासायची असल्यास तुम्ही खालील पध्‍दती ने चेक करु शकतात. चला तर पाहुया .


 सर्वप्रथम e-filing असं टाईप करुन गूगल ला सर्च करायच आहे.त्यानांतर तूम्हाला इनकम टैक्स डिपार्टमेंट ची वेबसाइट दिसेल     👇👇👇👇 

                     



 त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईटवर क्लिक केल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे वेबसाईट मध्ये तुम्हाला थोडसं खाली स्क्रोल करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर  लिंक आधार स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता .

                        👇👇👇


          



 

लिंक आधार स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन तेथे तुम्हाला तुमचा पँन क्रमांक खालील रकान्यात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता

                      👇👇👇


 पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली व्हिव लिंक आधार स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा.

                                👇👇👇

       


           

युवर पँन कार्ड आँलरेडी  लिंक इन गीव्हण your pan already linked to givan adhar आधार अशाप्रकारे तुमच्या समोर दिसेल. जरा अशा प्रकारचे नाँटिफीकेशन आले तर समजावे की आपलं पँन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे .

                               👇👇👇

     


 अशाप्रकारे स्क्रीन वर तुम्हाला दिसेल.

 आणखी वाचा >>आधार कार्ड अपडेट व डाउनलोड 


आणखी वाचा >> FIR व NCR काय फरक आहे 


आणखी वाचा >> मनरेगा जाँब कार्ड 

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक आहे?

आपल्या देशात अनेक लोक कर चोरी करतात, त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते, आणि पैसा जायला हवा, तेथे जात नाही, त्यामुळे देशाला किंवा राज्यालाही तोटा सहन करावा लागू शकतो, हे लक्षात घेऊन  पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे.  

 

 वरीवरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीही तुमचं पॅन कार्डआधार कार्डशी लिंक आहे का नाही हे मोबाईलवर पाहू शकता व वरी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व इतराना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी marathimahiti17.blogspt.com या वेबसाईटला भेट देत चला


Share:

आधार कार्ड अपडेट आणी डाउनलोड (adhar card update and download)

आधार कार्ड भारतात राहणार्यां प्रत्येक  व्यक्तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड नवीन निर्णयधार कार्ड माहिती मराठी  मध्ये देत आहोत. तसेच आधार कार्ड अपडेट का करावे, अधार कार्ड अपडेट साठी लागणारी कागदपत्रे, व अपडेट झालेल आधार कार्ड डाउनलोड मराठी माहिती (adhar card download marathi)  घर बसल्या मोबाईल वर कसे डाउनलोड करावे . या बद्दल सर्व माहिती येथे देत आहोत. 



आधार अपडेट का करण्याची गरज का?

👉🏻आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते.

👉🏻आयुष्यातील घटनेतील बदल उदाहरणार्थ विवाह यामुळे नाव व पत्ता यासारख्या मूलभूत जनसांख्यिक तपशीलांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे पत्ता व मोबाईल क्रमांकामध्येही बदल होऊ शकतो. रहिवाशांना आयुष्यातील विवाह तसेच नातेवाईकाचा मृत्यू यासारख्या घटनांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या तपशीलांमध्ये बदल करायचा असू शकतो. त्याचशिवाय, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी बदलण्यासाठी रहिवाशांची व्यक्तिगत कारणेही असू शकतात.

आधार अपडेट कसे करावे-:

तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

UIDAI च्या मते जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला काहि कागदपत्र आवश्यक असतात.पण कोणती कागदपत्र लागणार हे मात्र तुम्हाला काय अपडेट करायचे आहे, त्यावर अवलंबुन आहे. चला तर मग काय अपडेट करायला कोणती कागदपत्र पुरावा म्हणून  लागतात पाहुया.

ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-रेशन कार्ड 

3-मतदान कार्ड 

4-पासपोर्ट

5-ड्रायव्हींग लायसेन्स 

6-बँक पासबुक 

7-लाईट बील 

8-पाणी बील

जन्माचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पँन कार्ड

2-पासपोर्ट

3-मार्कशीट / गुण पत्रक 

4-जन्मचा दाखला

5-शाळा सोडल्याचा दाखला

नात्याचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:

1-पेन्शन कार्ड 

2-मनरेगा जाँब कार्ड 

3-पासपोर्ट

4-आर्मी कँन्टिन कार्ड 


सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. ( अधिकृत वेबसाइट - uidai.gov.in👇👇




 फोटो मध्ये दाखवल्याप्रमाने क्लिक करा त्यानंतर नंतर भाषा निवडावी लागेल . 👇👇




भाषा निवडल्यावर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल आणि नंतर आधार मीलवा (GET AADHAR) वर क्लिक करावे लागेल.(खालील फोटो पहा)👇👇




आधार मीळवा (GET AADHAR) वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला आधार डाऊनलोड करा (DOWNLOAD AADHAR) वर क्लिक करावे लागेल.👇👇



 त्यनंतर ई-आधार चे अधिकृत वेबपेज तुमच्या समोर उघडेल ज्यामध्ये तुम्ही login वर क्लिक करा.👇👇



त्यानंतर खालीप्रमाने पेज दिसेल तेथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 14 अंकी नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्यूअल आयडी टाकावा लागेल आणि कॅप्चा पडताळणी कोड टाकावा लागेल आणि SEND OTP बटणावर क्लिक करावे लागेल.👇👇




👉🏻 त्यानंतर तुमच्या आधार नोंदणी ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल आणि तो प्रविष्ट केल्यानंतर login बटणावर क्लिक करा.

👉🏻 त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या समोर येईल आणि तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता.

👉🏻 केल्यानंतर उघडा

👉🏻 जेव्हा तुम्ही ते उघडता तेव्हा तुम्हाला ते उघडण्यासाठी कोड टाकावा लागतो.

👉🏻 आधार कार्ड PDF साठी पासवर्ड 8 अंकी/ वर्णांचा आहे.

👉🏻 तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे कॅपिटल अक्षरांमध्ये (आधार कार्डवरील नावानुसार) आणि YYYY फॉरमॅटमध्ये जन्माचे वर्ष एकत्र करून पासवर्ड तयार केला जाईल.
{{समजा तुमचे नाव AISHWARYA असेल आणि तुमची जन्म वर्ष 2003असेल तर तुमचा पासवर्ड AISH2003 असा असेल.हे फक्त उदाहरणार्थ होत. तसा तुम्ही तुमचा पासवर्ड टाकुन आधार बघु शकता.}}
 


👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.

 मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.



केंद्र सरकार ने पी एम किसान योजनेच्या लाभार्थांला ई-केवासी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुवीधा उपलब्ध करुन दिली आहे.यामुले आता शेतकर्‍यांना स्वताचे किंवा इतरांचे सुध्दा केवासी घर बसल्या करता येणार आहे. चला तर मग ई-केवायसी कशी करावी ते पाहुया.

आणखी वाचा>>शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.

सर्वप्रथम आपल्या मोबाइल मध्ये असलेले जुने पीएम किसान अँप काडुन टाका 

                       👇👇👇

त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टेअर (play store) मध्ये जाऊन  pmkisan GoI हे अँप स्थापित करा (Install) करा.



                           👇👇👇

अँप स्थापित(Install) केल्यावर ते उघडा (ओपन करा) 

                          👇👇👇

त्यानंतर हिंदी किवा इंग्रजी भाषा निवडावी.     

                         👇👇👇

 त्यानंतर New Farmer Registration आणि Login यापैकी 'पीएम किसान' योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. ॲप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक

                          👇👇👇

त्यानंतर Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून 'पीएम' किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी तेथे आपला आधार नंबर टाकावा व GET OTP बटनावर क्लिक करावे. त्यानंतर जनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल तो आलेला चार अंकी OTP टाकावा व Login करावे.

                            👇👇👇

त्या नंतर स्वताचा सहा अंकी MPIN तयार करावा, कारण पुढच्या प्रक्रिया करताना याचा ऊपयोग करुन आपण केवायसी करणे व लाँग इन करणे सोपे होते.

                            👇👇👇

त्यानंतर ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबितटट असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल.

                           👇👇👇

त्यानंतर जर त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी  प्रलंबित असेल तर  "click hear to complete your e-kyc" यावर क्लिक करावे.

                          👇👇👇


आणखी वाचा >>किसान क्रेडिट कार्ड योजना 


त्यावर क्लिक केल्यावर थोड्या वेळापुर्वी तयार केलेला सहा अंकी MPIN टाकावा व consent form वर क्लिक करा.

                          👇👇👇

त्यानंतर scan face वर क्लिक करा. नंतर तुम्हाला faceRd app not install on your divice असं येईल नंतर त्याला ok करा.

                          👇👇👇

नंतर प्ले-स्टोअर वर adhar facrRd हे अँप स्थापित  (Install) करुन ते ओपन करा. 

                         👇👇👇

ते अँप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर computing face सुरु होईल नंतर समोर येणाऱ्या सुचनांचे पालन करुन procedd वर क्लिक करा. व मोबाईल चेहरा निट दिसेल अशा प्रकारे धरुन scan face करा. नंतर चेहरा स्कँन झाल्यावर image capture successful असं दिसेल.व आपल्या मोबाईलवर sucessful e-kyc अहा संदेश दिसेल. म्हणजेच तुमची e-kyc झाली.

                       👇👇👇

नंतर जर आपल्याला इतर कोनाची e-kyc करायची असेल तर e-kyc for other beneficiaries वर जाऊन वरी सांगितल्या प्रकारे करु शकता.

आणखी  वाचा >>1 रुपयात पिक विमा

आणखी वाचा >>बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels