पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात व आपण पशु-पश्यांच्या संकेतावरुन पावसाचा अंदाज कसा बांधु शकतो.

    पशु-पक्षी आपल्याला पावसाचा कसा संकेत देतात व आपण पशु-पश्यांच्या संकेतावरुन पावसाचा अंदाज कसा बांधु शकतो.


      मानवाने कीतीही प्रगती केली असली  तरी देखील मानवाला निसर्गावरच अवलंबुन राहाव लागत आहे. आपण कीतीही निसर्गाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तरी नीट बांधता येत नाही. आता पावसाचच बघाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या बारीक निरीक्षणावरुन हे संकेत लक्षात येतात. आपणही जर पशु-पक्षी यांच्या हालचाली निट बघितल्या तर आपणही बरोबर अंदाज बांधु शकतो.चला तर मग बघुया की पशु-पक्षी आपल्याला कसे संकेत देतात ज्यावरुन आपणही पावसाचा अंदाज अगदी सहज लाऊ शकतो.

👉🏻चातक पक्षी-:

मृगनक्षत्र वेळेवर असल्याचे संकेत व पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात.पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ समजावी.

👉🏻तित्तर पक्षी-:

 हा पक्ष्यांचे थवे 'कोडय़ान केको.. कोडय़ान केको..' अशा स्वरात ओरडू लागले की, लवकरच पाऊस येणार असे समजावे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की, पावसाचे लक्षण समजले जाते.

👉🏻पावशा पक्षी-:

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! 'पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

👉🏻वादली पक्षी-:

 कोळ्यांना वादळवाऱ्याचा संकेत देणारा वादळी पक्षी
पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार, याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मासेमार त्यांच्या बोटी समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळ वारा त्याच्या पाठोपाठ येत आहे, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.

👉🏻कावळा-:

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो हा जंगलातला अनुभव आहे. या व्कायतीरीक्त कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणाची ती नांदी असते. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे संकेत मिळू शकतात.यापुढे अजुन नोदवण्यासारखी बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस पडतो. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर दुष्काळाचे आगमन ठरते.

👉🏻चिमण्या-:

चिमण्याणी जर धुळीत लोळण्याचा खेळ सुरू केला तर समजावे लवकरच पाऊसाची शक्यता आहे.

👉🏻मोर-:

पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याच या देखण्या नाचावर लांडोर भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. हा पावसाचा पूर्वसंकेत आहे.

👉🏻टिटवी-:

टिटवी पक्ष्यांनी यावर्षी एकाच विणीच्या हंगामात दोनदा पिल्लं दिलीत.तर समजुन जा पाऊस लांबणार आहे.

जशा प्रकारे पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच काही प्राणीही संकेत देतात .

👉🏻वाघ-: 

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही वाघीन आपल्या पिल्लांना जन्म देत नाही. एवढच नाही तर पावसाची पूर्वकल्पना आल्यावर वाघीनी डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतात. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. कारण यंदा पाऊस नाही, त्यामुळे जंगलात गवत नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी पिल्ल उपाशी मरण्याची शक्यता तयार होते.

👉🏻 हरीण-: 

हरीण आणि वाघ जरी एकमेकांचे शत्रु असले तरी पावसाचा संकेत मात्र एकच देतात.जर पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणीही पिल्लांना जन्म देत नाहीत.

👉🏻मासे-:

डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा व उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार याची अंदाजे चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

👉🏻खेकडे-:

शेतकऱ्याला समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून पावसाचे संकेत मिळत असतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा काळ असतो.

👉🏻मगर-: 

 मगरीने जलाशयाच्या  बाजूच्या मातीत वा वाळूत अंडी घातल्यापासून बरोबर एकशेवीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो. अंड्यात पिलांची बिळांमध्ये वाढ होऊन मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धो धो वाहणाऱ्या पाण्याबरोबर  जवळच्या जलाशयात पोहोचतात.

👉🏻वाळवी/उधई-:

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवीला/उधई ला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते.


👉🏻 मुंग्या-:

जेव्हा काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेत असतील तर पाऊस नक्की पडतो असे समजा.


👉🏻बिळांमध्ये राहणारे प्राणी -:

 बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले तर हमखास पाऊस येतो. कारण या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते.

ज्याप्रकारे पशु-पक्षी पावसाचे संकेत देतात तसेच निसर्गातील काही झाडे झुडपेही काही संकेत देतात

👉🏻 मोरंबा किंवा बिब्याच झाड-:

मराठवाड्यात प्रचंड संख्येने आढळणाराह हा वृक्ष म्हणजे  गोडंबा, त्यालाच कहि ठीकाणी बिब्याच  झाड म्हणतात जर या झाडाला बहर येला म्हणजे हे दुष्काळाचे संकेत मानला जातो.याबरोबरच खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो.

👉🏻चिंच-:

चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुले आणि कोवळी फळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असाते.

 👉🏻आंबा-:

ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतो त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

👉🏻 मारुती चितमपल्ली यांच्या चार-पाच दशकांच्या जंगलाच्या प्रगाढ अभ्यासाप्रमाणे हरितपर्णी वृक्षांची वनं आणि शुष्कपर्णी पानगळीची जंगलं वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात.
 
👉🏻 ही माहिती आवडली असल्यास  इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर  महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.

Share:

बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

 बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? बियाने खरेदी करताना फसवल्यास काय करावे ?बियाने उगवलेच नाही तर काय करु ? 



पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते.  त्यामुळे मशागतीची कामे उरकून बियाणे  व खत खरेदीसाठी शेतकरी लगबग करत आहेत.  मात्र ही बियाने खरेदी करताना शेतकरी अनेकदा फसवला जातो मात्र हि फसवणूक आपणाला सहज टाळता येवू शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. चला तर मग आता आपण या लेखात बियाने खरेदी करताना काय काळजी घ्यावी या विषयी माहिती पाहूया.


बियाने खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या-:

👉🏻सर्वात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. 


👉🏻जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे त्यावर दुकानाचे नाव, खरेदीदाराचे नाव, बियाणे उत्पादकाचे नाव, लॉट क्रमांक,व  विक्री किंमत असल्खायाची खात्री करून घ्यावी .  दिलेल्या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची सही किंवा अंगठा असला पाहिजे. 


👉🏻दुकानदाराकडुन पक्क्या बिलाचा आग्रह धरावा व बिल  व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻खरेदी केलेल्या बियाण्याची  पाकिटे सीलबंद आहेत किंवा नाही यांची खात्री करावी


👉🏻बियाणे खरेदी करण्याआधी पाकीटावरील अंतिम मुदत पाहणे जरुरीचे आहे.


👉🏻बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमतीपेक्षा दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. 


👉🏻पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.


👉🏻बियाणाची पिशवी तिन्ही बाजूंनी शिवलेली असावी. वरील बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते.  पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरणचा टॅग व्यवस्थित राहतील. लेबल आणि टॅग व्यवस्थित जपून ठेवावे.


👉🏻मुदतबाह्य झालेले व पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.


बियाणं विषयी काही तक्रार असेल तर काय करावे-:

बियाणं विषयी काही तक्रार असेल तर बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आसतात. तसेच प्रमाणा पेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती याच्याकडे नमुन्याची तपासणीसाठी  तक्रार अर्ज  स्वरूपात द्यावी. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी केलेल्या बिलाची zerox जोडावी. पेरणी झाल्यानंतर उगवण क्षमता कमी झाल्याचे आढळून आल्यास, तसेच दाने न भरल्यास, बियाणे सदोष असल्याची तक्रार करता येऊ शकते.बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता/ उत्पादक यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १९ नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.


👉🏻शेतकर्‍यांच्या सोयीसाठी तालुका स्तरावर बियाणे तक्रार समिती गठीत कलेली असते.



वरील दिल्या गेलेल्या गोष्टींचे आपण तंतोतंत पालन केले तर  होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतो. आणि  भविष्यात होणार आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो .

Share:

दहावीचा निकाल आज........

 


⭕️♦️⚠️दहावीचा निकाल आज...


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज(२ जून ) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल व त्याची मुद्रित प्रतहि घेता येईल.

⚠️पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून नोंदणी.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

कीती विद्यार्थी आहेत-:

२ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत दहावीची परीक्षा ५ हजार ३३ केंद्रांवर घेण्यात आली होती. यार्षी परीक्षेला राज्यभरातून एकुन१५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी काय करावे-:


निकालानंतर गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जून, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.



Share:

फक्त १ रुपयात काढा पीक विमा. काय आहे हि योजना?

 फक्त १ रुपयात पीक विमा योजना काय आहे?त्याची नोंदणी कशी करावी? १ रुपयात पीक विमा नोंदणी कोठे करावी? १ रुपयात पीक विमा कश्यासाठी?




शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपयांत पिक विमा (pik vima) काढून मिळेल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. अगोदर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना विमा हप्त्याची 2% रक्कम भरावी लागत होती. आता मात्र शेतकर्‍यांवरचे हे ओझे महाराष्ट्र सरकारने कमी केले आहे कारण आता शेतकर्‍यांकडून फक्त 1 रूपया घेऊन उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा अधिकचा. बोजा पडणार आहे .

👉१ रुपयात पीक विमा मिळवण्यासाठी नोंदणी कोठे करावी ?

1 रुपयात पीक विमा याचा लाभ जर घ्यायचा असेल तर अगोदर आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे लक्षात असूद्या. ही नोंदणी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात   PM किसान योजनेच्या वेबसाइट वर करता येणार आहे. जर घरी बसून ही नोंदणी करता येत नसेल तर आपल्या जवळील “आपले सरकार सेवा केंद्र” सेंटर ला भेट देऊन ही नोंदणी करून घ्या.
 

विमा कवच का?


👉हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर,दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.

👉पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र होतो.

👉स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्रात अतिरिक्त  पाऊस होऊन नुकसान झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. 

👉किड, रोगांमुळे होणारी नुकसान भरपाई मिळावी यासाठी.

निष्कर्ष -:

 हा लेख १ रुपयात पीक विमा योजना संदर्भात आहे , महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे , जर तुम्ही शेतकरी असाल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना पर्यंत जरूर हि माहिती पोहचवा.

Share:

भोगवटदार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची?करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.

 भोगवटादार वर्ग. 2 ची जमीन शासनाकडुन मिळालेली जमीन आपल्या मालकीची कशी करायची वर्ग 1 मध्ये कशी आणायची? करणे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे संपूर्ण माहिती.



भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार असतो. त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा आणि ती जमिन बक्षीसपात्र म्हणुन देण्याचे पूर्ण अधिकार बहाल केलेल असतात. अशा जमीनींचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री व हस्तांतरणासाठी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते . ही मालकीची वडलोपार्जीत आलेली जमीन  असते.

भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय?

जो खातेदार फार पूर्वी पासून जमीनीचा कब्जेदार तर असतो. पण त्याला ती जमिन विकण्याचे त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार नसतं त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असते.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन, हैद्राबाद अतियात जमिनी, वतनाच्या जमीन, वनजमीन, गायरान, पुनपुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. 

👉भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी शासनातर्फे शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी या जमिनीबाबत व्यवहाराचे अधिकार नसतात. म्हणजेच या जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी जर भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत कशी करावी?

भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी तुम्हाला अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या भावाच्या आर्धी (50%)  रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.(अर्थीत शासनकडुन आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलत देण्यात येते.)  वर्ग 2 ची जमीन भोगवटादार क्रमांक 1 मध्ये करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन(प्रत्यक्ष) पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो .तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी नुसार ही जमीन तुम्हाला भोगवटादार क्रमांक 2 मधून भोगवटादार क्रमांक 1 मध्ये रुपांतरीत करून मिळते.

भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-


👉जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज.

👉 जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा.

👉विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र.

👉7/12 व उतारा मधील सर्व फेरफार नोंदी.

👉आकरबंदाची मूळ प्रत.

👉एकत्रीकरनाचा मूळ उतारा.

👉मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत
कबुलायत.

👉तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा.

#भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामधील सवलतीला 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.


👉 तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास  इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर  महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व  आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.




Share:

महाराष्ट्रामध्ये फीरण्यासाठी चांगली 10 ठिकाण कोणती आहेत?

फिरायला जायचा प्लान करताय तर कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कमी खर्चात, कमी वेळात आपण महाराष्ट्रातच सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा व सहलीचा आनंद लुटू शकतो.चला तर मग पाहुया महाराष्ट्रातील फिरण्यासाठी चांगली 10 ठीकाने 

1}मुंबई -:

मुंबईमुंबई शहर हे स्वन्नांचे तसेच कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असून ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे विविध खाण्याची दुकाने, अदभूत वास्तुकला आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. सुट्टी घालविण्यासाठी विविध मनोरज ठिकाणांनी भरलेले ठिकाणे आहेत. तसेच प्रसिध्द मंदिर, चर्च, मस्जिद अशा धार्मीक स्थळांना देखील भेट देण्यासारखे सुंदर ठिकाणे आहेत.
1-मुंबई मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम पर्यटन ठिकाण: गेटवे ऑफ इंडिया
2-मुंबई चे समुद्रकिनारे: चौपाटी आणि जुहू बीच
3- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
4-वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय
5-सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर
6-हाजी अली
7-नेहरू तारांगण

2}रायगड-:

रायगडावर फिरण्यासाठी अनेक प्रवेशद्वार, मंदिरे, पाण्याची टाकी, राजवाडे आणि हिरकणी बुरुज
प्रवेशद्वार,महा दरवाजा, पालखी दरवाजा, नगारखाना दरवाजा आणि मेणा दरवाजा
मंदिरे जगदीश्वर मंदिर, सतीची समाधी आणि राणी महालाचे अवशेष,पाण्याच्या टाक्या,गंगा सागर, टकमक, हत्ती तलाव आणि खुबलाधा बुरुज , छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध पुतळा, टकमक टोक डोंगर आणि राणी वसा 

3}महाबळेश्वर-:

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.
महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्थर्स सीट ह्या पॉईंट वरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते. महाबळेश्वर मधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय.

4}छत्रपती शाहू संग्रहालय-:

कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालय 1877 - 1884 या कालावधीत बांधण्यात आले होते. त्याची रचना ब्रिटिश वास्तुविशारद 'चार्ल्स मांट' यांनी केली होती आणि गुजरात आणि राजस्थानमधील जैन आणि हिंदू प्रभावांचे मिश्रण असलेल्या स्थापत्य शैलीनुसार ते बांधले गेले होते. स्थानिक राजवाडा शैलीचा स्पर्श. सध्याच्या काळात, राजवाड्याचा एक मोठा भाग म्हणजे पहिला मजला आजही कोल्हापूरच्या विद्यमान महाराजांचे निवासस्थान म्हणून वापरला जात आहे आणि दुसरीकडे, तळमजला संग्रहालयात रूपांतरित झाला आहे, जो छत्रपती शाहू महल म्हणून ओळखला जातो.

5}अजंठा-वेरुळ -:

संभाजिनगर जिल्ह्यातील या काही विशेष पर्यटन स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.त्या मध्ये याचां सामावेश झाला आहे म्हणुन हि विशेष ठिकाणं बघण्यासाठी केवळ देशातील नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे गर्दि करतात .

6} पाचगणी-:

पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर आहे. आल्हाददायक हवामान आणि शांत वातावरणामुळे सुंदर जंगलात हरवून जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. छोटय़ा छोटय़ा शेतजमिनी आणि वाडय़ांमधून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे दृश्य हे या निर्मळ स्थानाचे सर्वात प्रशंसनीय वैशिष्ट्य आहे. पाचगणी तुमची भटकंतीची इच्छा पूर्ण करेल आणि तुम्हाला या हिल स्टेशनच्या प्रेमात पडेल.

7}लोणार सरोवर -:

लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक अतिशय सुंदर आणि रहस्यमय तलाव आहे. लोणार क्रेटर तलावाचा उगम सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर जेव्हा उल्का आदळला तेव्हा झाला असे मानले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचे पाणी खारा आणि क्षारीय आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अशा प्रकारचे एकमेव सरोवर आहे. या चमत्कार आणि वैशिष्ट्यांमुळे लोणार क्रेटर तलाव दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते

8}चिखलदरा-:

चिखलदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्ह
येथे मुख्य ठीकाणे-
पंचबोलचे नाव इको पॉईंट.
देवी पॉईंट
नर्सरी गार्डन
प्रॉस्पेट पॉईंट
बेलाव्हिस्टा पॉईंट
बेलेन्टाईन पॉईंट
भीमकुंड‎

9}नागपुर -:

विदर्भात नागपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळे 
दीक्षाभूमी, उमरेड कर्‍हांडला वन्यजीव अभयारण्य, अंबाझरी तलाव व उद्यान, फुटाळा तलाव, पेंच व्याघ्र प्रकल्प, गोरेवाडा तलाव, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, रामटेक किल्ला, क्रेझी कॅसल एक्वा पार्क, खिंडसी तलाव, रमण सायन्स सेंटर, श्री गणेश मंदिर. , स्वामीनारायण मंदिर, फन एन फूड व्हिलेज आणि बरेच काही.

10}ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प-:

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे. त्याच्या उष्णकटिबंधीय कोरड्या पर्णपाती वन परिसंस्थेमध्ये किमान बंदर आहे 80 वाघ, आणि मोठ्या लँडस्केपमध्ये 200 पेक्षा जास्त वाघ आहेत. ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी वाघांची संख्या म्हणून ओळखली जाते. ताडोबा यासह इतर अनेक मांसाहारी प्रजातींना देखील समर्थन देतो बिबट्या आणि ढोले, सांबर, चितळ, रानडुक्कर आणि गौर सर्वात सामान्य शिकार प्रजाती आहे.
ताडोबाच्या इतिहासाबद्दल आणि जैवविविधतेबद्दल अधिक जाणून घ्यायच असेल तर आवश्य भेट दया. 
Share:

स्वामी रामानंद तीर्थ-हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार

स्वामी रामानंद तीर्थ -: हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून केलेल कार्य व मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान याविषयी थोडक्यात माहिती 

👉 हैदराबाद जनतेचे स्वातंत्र्य आंदोलन ज्यांच्या नेतृत्वात चालले ते स्वामी रामानंद तीर्थ मूळचे हैदराबाद संस्थानचे नव्हते.त्यांचे मूळ गाव सिंदगी जि. विजापूर हे होते.

👉 जन्म -:3 ऑक्टोबर 1903

👉आईचे नाव -:लक्ष्मीबाई

👉वडिलाचे नाव-:भगवान 

 त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. ते प्राथमिक  शाळेत  शिक्षक होते

👉 शिक्षण-:स्वामींचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले होते. नंतरचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोर्ट या सरकारी शाळेत झाले.असहकाराच्या आंदोलनात मॅट्रिकची शाळा सोडली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची शालांत परीक्षा पास होऊन अमळनेर व पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेत पुढील शिक्षण घेतले. 'पारंगत' ही एम. ए.च्या समकक्ष पदवी त्यांनी  मिळवली होती.1970 साली मराठवाडा विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉज' ही पदवी दिली.

👉 चळवळीत प्रत्यक्ष सहभाग-:1935 साली हिप्परग्याची शाळा सोडून स्वामीजी व बाबासाहेब परांजपे यांनी आंबाजोगाई येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाचे पुनरूज्जीवन केले. लातूरला 1938 साली झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात स्वामीजींनी शिक्षण क्षेत्र सोडून देऊन राजकीय चळवळीला पूर्ण वाहून घ्यावे असा निर्णय झाला. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी तसेच व नागरी हक्क द्यावेत यासाठी केलेल्या सत्याग्रहात स्वामीजींना अटक होऊन दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी सुटका झाल्यावर एप्रिल 1939 मध्ये हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.गांधीजींच्या 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रहात हैदराबाद संस्थानातून जे पाच जण निवडण्यात आले होते त्यापैकी स्वामीजी हे एक होते. त्यांना निझामाबादच्या तुरुंगात ठेवले होते. 1946 साली स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवल्यानंतर हैदराबाद येथे झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्वामीजींसह स्टेट काँग्रेसचे अनेक नेते आर्थिक व सामाजिक समतेच्या बाबतीत आग्रही होते शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत होते. हैदराबाद स्वतंत्र झाल्यावर जहागिरदारी, सरंजामदारी नष्ट करणारे कायदे झाले व पुरोगामी स्वरूपाचा कूळ कायदा अंमलात आला, याचे बरेचसे श्रेय स्वामीजींना जाते. ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 दरम्यान साम्यवाद्यांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.. कम्युनिस्ट पक्षाने सरकार पाडण्यासाठी हिंसेचे धोरण स्वीकारले व तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. शेतकऱ्यांच्या गनिमीकाव्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला. कम्युनिस्टांच्या हिंसक धोरणांना स्वामीजींचा विरोध केला होता पण तेलंगणातील शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांना मान्य नव्हता. 1951 साली साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.

👉राजकरणातील सहभाग-:1952 साली गुलबर्गा व 1957 साली स्वामीजी औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.

👉1967 साली आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्वामी ओमकारांच्या आश्रमात स्वामी रामानंद तीर्थांनी 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' ही संस्था स्थापन केली. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम कार्यकर्त्यांसाठी त्यानी चालवला.

👉निधन-:22जानेवारी1972 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी हैद्राबाद येथे प्राणज्योत मालवली. हैद्राबादमधील बेगमपेठ येथे त्यांची समाधी आहे.




Share:

Join gruop

Main Tags

Contact Form

Name

Email *

Message *

Search

Main Tags

Marathimahiti17

Labels