आर,गुंठा,एकर,हेक्टर,बिघा,म्हणजे कीती?
मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय?
मनरेगा जाँब कार्ड म्हणजे काय व कसे बनवावे ?मनरेगा जाँब कार्डचे फायदे , मनरेगा जाँब कार्डसाठी कागदपत्रे व प्रोसेस काय असते .
जाँब कार्डची गरज काय-:
जॉब कार्ड जॉब कार्ड ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जारी केले जाते. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत बनवलेले एक कार्ड आहे.ज्याद्वारे ते प्रत्येक वर्षात कोणतेही अकुशल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 25 ऑगस्ट 2005 रोजी कायद्यानुसार 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काम करण्यासाठी किंवा मागण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.या जॉब कार्डने लोकांना काम करण्याच्या अधिकाराची हमी दीली आहे. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील या कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच त्याने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल, याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉब कार्डमध्ये नोंदवली जाते. यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत जॉब कार्ड दिले जातात.
जाँब कार्डमध्ये काय असते-:
या कार्डमध्ये खालील माहिती असते
👉 जाँब कार्ड क्रमांक.
👉उमेदवाराचे नाव.
👉वडील किंवा पतीचे नाव.
👉पंचायत व जिल्ह्याचे नाव.
👉ग्रामसभेचे नाव.
👉वय.
👉लींग.
जाँब कार्ड कसे बनवावे -:
जॉब कार्ड काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत जावे लागेल. तुमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी कडून जॉब कार्ड बनवण्यासाठी एक अर्ज द्यायचा. त्याला भरून ते सांगतील ते आवश्यक कागदपत्रे जोडुन त्यांच्याकडे जमा करायचा. त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचे जॉब कार्ड बनेल. तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल त्या नंबर चा वापरुन तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.
मनरेगा जाँब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे-:
👉उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र.
👉 अर्जाचा नमुना.
👉पासपोर्ट आकाराचे फोटो.
👉पत्त्याचा पुरावा.
👉रेशन कार्ड.
👉आधार कार्ड.
👉पासबुक.
👉मोबाईल नंबर.
जॉब कार्डवर ऑनलाइन नाव कसे पहावे-:
सर्वप्रथम जॉब कार्डच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in वर जा. येथे दिलेल्या लिंकद्वारे थेट वेबसाइटवर जाण्यास येथे क्लिक करा.
👇
जॉब कार्ड वेबसाइट उघडल्यानंतर, ग्रामपंचायत अंतर्गत अहवाल तयार करा – जॉब कार्ड पर्याय निवडा.
👇
आता सर्व राज्यांची यादी उघडेल. त्यात तुमच्या राज्याचे नाव शोधा आणि ते निवडा.
👇
यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. यामध्ये प्रथम आर्थिक वर्ष निवडा. यानंतर तुमच्या जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.
👇
आता जॉब कार्डशी संबंधित माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय दिसतील. जॉब कार्डमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी R1 बॉक्समधील JobCard/Employment Register पर्याय निवडा.
यानंतर, तुम्ही निवडलेल्या ग्रामपंचायतीची जॉबकार्ड यादी उघडेल. तुम्ही जॉब कार्डमध्ये तुमचे नाव येथे तपासू शकता. अशा प्रकारे तुम्ही आँनलाईन नआव व इतर तपशील संकेतस्थळावर पाहु शकत.
आणखी वाचा >> 1 रुपयांत काढा पिक विमा.
मनरेगा जाँब कार्डचे फायदे-:
👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, लाभार्थ्याला 100 दिवसांचा रोजगार मिळतो.
👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत, राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नरेगा जॉब कार्ड दिले जाईल.
👉या योजनेंतर्गत लोकांना त्यांच्याच क्षेत्रात काम मिळते, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही.
👉या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजगार मिळु शकेल. जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
👉जॉब कार्डमध्ये अर्जदार आपले नाव आणि जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतो.
👉मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातही लाभ दिला जातो.
👉 जॉब कार्डद्वारे भारतातील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
👉नरेगा जॉब कार्डमध्ये प्रत्येक राज्यातील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.
👉 देशातील सर्व राज्यातील गरीब लोक जॉब कार्डचा लाभ घेऊ शकतात.
👉नरेगा जॉब कार्डची सुविधा ऑनलाइन असल्याने अर्जदाराचा वेळही वाचतो.
👉जॉब कार्डमध्ये तुम्हाला मनरेगा योजनेद्वारे मिळणार्या कामाची सर्व माहिती तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.
👉अर्ज केल्याच्या १५ दिवसांत काम न मिळाल्यास नियमितपणे बेरोजगार भत्ता दिला जाईल.
👉योजनेंतर्गत नोकरीसाठी केवळ प्रौढ सदस्य पात्र आहेत.
👉 प्रत्येक प्रकल्पात किमान एक तृतीयांश महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.
👉कामाचे ठिकाण ५ कि.मीच्या असते बाहेर असल्यास, कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता दिला जातो.
👉महिला आणि वृद्धांना त्यांच्या परिसरात काम करण्यास प्राधान्य दिले जाते.
आणखी वाचा >> जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना
मनरेगा योजनेंतर्गत सर्व कामगारांना ऑनलाइन सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा कामगारांसाठी अधिकृत मोबाइल अप्लिकेशन सुरू केले आहे. ज्यातून तुम्ही घरबसल्या नरेगाशी संबंधित माहिती मिळवू शकता. अँप डाउनलोड करण्यासाठी 👇👇
हे अँप डाउनलोड करून तुम्ही सर्व माहिती मोबाइल मध्ये बघु शकता.
आणखी वाचा >> भोगवटादार वर्ग-2 ची जमीन वर्ग 1मध्ये कशी आणायची
लंपी विषाणू लागण,कारणे,प्रादुर्भाव,उगम,प्रसार मराठी माहिती.
काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व भारतात प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती.
काय आहे लंपी विषाणू-:
लंपी विषाणूचा उगम व भारतात प्रसार -:
लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव-:
लंपी रोगाची लक्षणे-:
लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय -:
जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)
जमीनीचे वाद मीटवणारी सलोखा योजना मराठी माहिती ( jaminiche vad mitvnari salokha yojana marathi mahiti)
सलोखा योजना मराठी माहिती.सलोखा योजना पात्रता काय आहे.सलोखा योजना अटी व शर्तीं.सलोखा योजना अर्ज प्रक्रिया मराठी माहिती.
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही 50%पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार कृषी क्षेत्र पुरवते. करोना सारख्या महामारीत सर्व क्षेत्र बंद असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरुन धरले होते.एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मालकी हक्काचे वाद, शेत बांदाचे वाद, जमिनीचा ताबावाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, हस्तांतरणाचे वाद, भावंडाच्या वाटणीवरुन वाद, शासकीय नियोजनातील चुका यातुन उद्भवलेल वाद यां वादामुळे समाजात वातावरण दुषीत होत आहे. हे शेताचे वाद अतीशय गुंतागुंतीचे व वेळाखाऊ असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू होतो. आता यातुन सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना नावाने एक योजना 3 जानेवारी 2023 पासून आणली आहे.अशा करुयात की या योजनेच्या नीमीत्ताने का होईना हे वाद संपतील.
सलोखा योजनेची अवश्यकता का आहे-:
सलोखा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया -:
सलोखा योजनेचे निकष व अटी-:
सलोखा योजनेचे फायदे -:
आधार कार्ड अपडेट आणी डाउनलोड (adhar card update and download)
आधार कार्ड भारतात राहणार्यां प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड नवीन निर्णय व आधार कार्ड माहिती मराठी मध्ये देत आहोत. तसेच आधार कार्ड अपडेट का करावे, अधार कार्ड अपडेट साठी लागणारी कागदपत्रे, व अपडेट झालेल आधार कार्ड डाउनलोड मराठी माहिती (adhar card download marathi) घर बसल्या मोबाईल वर कसे डाउनलोड करावे . या बद्दल सर्व माहिती येथे देत आहोत.
आधार अपडेट का करण्याची गरज का?
👉🏻आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते.
👉🏻आयुष्यातील घटनेतील बदल उदाहरणार्थ विवाह यामुळे नाव व पत्ता यासारख्या मूलभूत जनसांख्यिक तपशीलांमध्ये बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे पत्ता व मोबाईल क्रमांकामध्येही बदल होऊ शकतो. रहिवाशांना आयुष्यातील विवाह तसेच नातेवाईकाचा मृत्यू यासारख्या घटनांमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या तपशीलांमध्ये बदल करायचा असू शकतो. त्याचशिवाय, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी बदलण्यासाठी रहिवाशांची व्यक्तिगत कारणेही असू शकतात.
आधार अपडेट कसे करावे-:
तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
UIDAI च्या मते जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला काहि कागदपत्र आवश्यक असतात.पण कोणती कागदपत्र लागणार हे मात्र तुम्हाला काय अपडेट करायचे आहे, त्यावर अवलंबुन आहे. चला तर मग काय अपडेट करायला कोणती कागदपत्र पुरावा म्हणून लागतात पाहुया.
ओळखीचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:
1-पँन कार्ड
2-रेशन कार्ड
3-मतदान कार्ड
4-पासपोर्ट
5-ड्रायव्हींग लायसेन्स
6-बँक पासबुक
7-लाईट बील
8-पाणी बील
जन्माचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:
1-पँन कार्ड
2-पासपोर्ट
3-मार्कशीट / गुण पत्रक
4-जन्मचा दाखला
5-शाळा सोडल्याचा दाखला
नात्याचा पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे -:
1-पेन्शन कार्ड
2-मनरेगा जाँब कार्ड
3-पासपोर्ट
4-आर्मी कँन्टिन कार्ड
सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. ( अधिकृत वेबसाइट - uidai.gov.in👇👇
मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.
मोबाईलवर ई-केवायसी(e-Kyc)कशी करावी.ई-केवायसी e-kyc करा अन 12000 मीळावा.
केंद्र सरकार ने पी एम किसान योजनेच्या लाभार्थांला ई-केवासी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुवीधा उपलब्ध करुन दिली आहे.यामुले आता शेतकर्यांना स्वताचे किंवा इतरांचे सुध्दा केवासी घर बसल्या करता येणार आहे. चला तर मग ई-केवायसी कशी करावी ते पाहुया.
आणखी वाचा>>शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये.
सर्वप्रथम आपल्या मोबाइल मध्ये असलेले जुने पीएम किसान अँप काडुन टाका
👇👇👇
त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टेअर (play store) मध्ये जाऊन pmkisan GoI हे अँप स्थापित करा (Install) करा.
👇👇👇
अँप स्थापित(Install) केल्यावर ते उघडा (ओपन करा)
👇👇👇
त्यानंतर हिंदी किवा इंग्रजी भाषा निवडावी.
👇👇👇
त्यानंतर New Farmer Registration आणि Login यापैकी 'पीएम किसान' योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. ॲप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक
👇👇👇
त्यानंतर Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून 'पीएम' किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी तेथे आपला आधार नंबर टाकावा व GET OTP बटनावर क्लिक करावे. त्यानंतर जनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल तो आलेला चार अंकी OTP टाकावा व Login करावे.
👇👇👇
त्या नंतर स्वताचा सहा अंकी MPIN तयार करावा, कारण पुढच्या प्रक्रिया करताना याचा ऊपयोग करुन आपण केवायसी करणे व लाँग इन करणे सोपे होते.
👇👇👇
त्यानंतर ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबितटट असल्यास "Your e-KYC is pending for completion" असा संदेश दिसेल.
👇👇👇
त्यानंतर जर त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असेल तर "click hear to complete your e-kyc" यावर क्लिक करावे.
👇👇👇
आणखी वाचा >>किसान क्रेडिट कार्ड योजना
त्यावर क्लिक केल्यावर थोड्या वेळापुर्वी तयार केलेला सहा अंकी MPIN टाकावा व consent form वर क्लिक करा.
👇👇👇
त्यानंतर scan face वर क्लिक करा. नंतर तुम्हाला faceRd app not install on your divice असं येईल नंतर त्याला ok करा.
👇👇👇
नंतर प्ले-स्टोअर वर adhar facrRd हे अँप स्थापित (Install) करुन ते ओपन करा.
👇👇👇
ते अँप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर computing face सुरु होईल नंतर समोर येणाऱ्या सुचनांचे पालन करुन procedd वर क्लिक करा. व मोबाईल चेहरा निट दिसेल अशा प्रकारे धरुन scan face करा. नंतर चेहरा स्कँन झाल्यावर image capture successful असं दिसेल.व आपल्या मोबाईलवर sucessful e-kyc अहा संदेश दिसेल. म्हणजेच तुमची e-kyc झाली.
👇👇👇
नंतर जर आपल्याला इतर कोनाची e-kyc करायची असेल तर e-kyc for other beneficiaries वर जाऊन वरी सांगितल्या प्रकारे करु शकता.
आणखी वाचा >>बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी!
👉🏻ही माहिती आवडली असल्यास इतरांना शेअर करा. व अशा प्रकारची आजुन इतर विषयावर महत्वपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट विभागात कमेंट करुन सांगा व आमच्या https://marathimahiti17.blogspot.com या वेबसाईटवर भेट देत चला.
कीसान क्रेडिट कार्ड(kisan credit card scheme)
काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme) किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी पात्रता काय आहे (Eligibility Criteria for Kisan Credit Card Loan Scheme)किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी कागदपत्र (documents for kcc) किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे(Benifit of KCC)किसान क्रेडिट कार्ड तक्रारीसाठी हेल्पलाईन नं , किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?
भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान ,पाऊस हे प्रमुख घटक आहेत. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.
काय आहे कीसान क्रेडिट कार्ड योजना(what is a kisan credit card scheme)-:
👉🏻किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देते.
👉🏻किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये शेतकर्यांना अल्पकालीन औपचारिक क्रेडिट प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि नाबार्ड द्वारे तयार करण्यात आली.
👉🏻कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जाच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू करण्यात आली.
👉🏻हे त्यांना अल्प-मुदतीचे कर्ज मिळवून देण्यासाठी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या इतर खर्चासाठी क्रेडिट मर्यादा प्रदान करते.